नवी दिल्ली/मुंबई : बहुचर्चीत पीएनबी घोटाळ्यात सामिल मेहुल चौकसी आणि नीरव मोदी याच्याची निगडीत ठिकाणांवर सीबीआयची छापेमारी सुरू आहे. याप्रकरणी सीबीआयने आपल्या रिपोर्टमध्ये मेहुल चौकसीच्या कंपनीच्या डिरेक्टर्सचे नावंही सामिल केले आहेत.
आणि एफआयआरमध्येही सर्व नावे दिली आहेत. पण धक्कादायक बाब म्हणजे एवढ्या मोठ्या कंपनीच्या डिरेक्टर्सच्या रजिस्टर्ड ठिकाणांवर झी न्यूजची टीम पोहचली तर चित्र वेगळंच होतं. सोबतच हेही उघड झालं की, ज्या कंपनीचे दागिने घालून सिलिब्रिटीज रेड कार्पेटवर उतरत होते, त्या कंपनीचा डिरेक्टर एक सर्वसामान्य माणूस आहे.
मेहुल चौकसीच्या कंपनीचा डिरेक्टर्स मुंबईच्या एका चाळीत राहतो, जिथे क्वचितच सुविधा आहे. कंपनीचा डिरेक्टर खूपच साधारण व्यक्ती आणि छोटा रिटेल गुंतवणुकदार आहे. त्याला फसवून गिली इंडिया लिमिटेड, नक्षत्र ब्रॅंड लिमिटेड आणि गीतांजली जेम्स कंपनीत ऑन पेपर टॉप मेंबर बनवण्यात आलंय.
मुंबईच्या दहिसर येथील मिहिर जोशीचं नाव एफआयआरमध्ये सामिल आहे. हा व्यक्ती गिली इंडियाचा डिरेक्टर आहे. एफआयआरमध्ये त्याचा पत्ता वन रूम किचन असलेलं घर देण्यात आलाय. ते घर त्याने रेन्टने दिलंय तर तो शेजारच्या एका प्लॅटमध्ये राहू लागलाय. जोशीचा भाडेकरू जमना प्रसाद याने सांगितले की, ‘पोलीस गेल्याच आठवड्यात इथे आले होते. आम्ही ७ हजार रूपये भाडे देतो, पण मिहिर जोशीसोबत आमची कधी भेट झाली नाही. कधी त्याचे वडील रेन्टचे पैसे घेण्यासाठी येतात तर कधी आम्ही त्यांच्या घरी पैसे देण्यासाठी जातो’.
गेल्या काही दिवसात बॅंक घोटाळा समोर आल्यानंतर सीबीआय आणि ईडीचे अधिकारी नेहमीच इथे विचारपूस करण्यासाठी येतात. त्यामुळे या तथाकथित डिरेक्टर्सचं जीवन पार बदललं आहे. त्यांचे शेजारी आणि परिवारातील सदस्यही घोटाळ्यात नाव आल्याने परेशान आहेत. सरकारी नियमांनुसार सर्व कंपन्यांना आपल्या डिरेक्टर्सचे पत्ते आणि इतर माहिती देणे गरजेचे असते.
सीबीआय इन्फॉर्समेंट डायरेक्टरोट, इन्क्म टॅक्स विभागसारख्या यंत्रणा याप्रकरणाची चौकशी करत आहेत. तर नीरव मोदीसोबत या घोटाळ्यातील गीतांजली जेम्सचा प्रोमोटर मेहुल चौकसी देश सोडून फरार आहे. सरकारने यांचे पासपोर्ट सस्पेंड केले आहेत.