मुंबई: अरबी समुद्रात आलेल्या Tauktae चक्रीवादळात एक मालवाहू जहाज (Barge-P305) समुद्रा भरकटले. त्यानंतर Barge-P305 या जहाजाची बचाव मोहीम सुरु करण्यात आली. आतापर्यंत जहाजातील 261 जणांपैकी 184 जणांना वाचविण्यात आले आहे. मात्र, 76 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.
आतापर्यंत 618 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले
Barge-P305 जहाजातून 184 व्यतिरिक्त, जीएएल कन्स्ट्रक्टर ( GAL Constructor) जहाजात अडकलेल्या सर्व 137 लोकांना भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाने वाचवले आहे. Barge SS3चे 196 लोक आणि ड्रिल ऑईल सागर भूषणमधील 101 लोक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.
बार्ज पी -305 वर बचाव कार्य सुरुच
Barge-P305 या जहाजात 76 लोक अद्याप अडकले आहेत आणि आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता यांच्यासह भारतीय नौदलाचे बियास, बेतवा (Beas, Betwa) आणि Teg Naval Shipsही शोध घेत आहे. बचाव कार्य अजूनही सुरुच आहेत. बार्ज पी 305 मुंबईपासून 35 नॉटिकल मैलांच्या अंतरावर बुडला आहे. शोध आणि बचाव कामात पी 8 आय आणि नेव्हल हेलिकॉप्टरची मदतही घेण्यात येत आहे.
अडकलेल्या लोकांच्या माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आले आहेत. बार्ज पी 305 मध्ये अडकलेल्या लोकांची माहिती घेण्यासाठी एक हेल्पलाईन जारी करण्यात आली आहे.
AFCONS हेल्पडेस्क आणि सपोर्ट टीम :
करणदीप सिंह - +919987548113, 022-71987192
प्रसून गोस्वामी - 8802062853
ओएनजीसी हेल्पलाइन:
022-2627 4019
022-2627 4020
022-2627 4021
दरम्यानन, काल नौदलाच्या युद्धनौकांकडून युद्धपातळीवर अरबी समुद्रात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी मोहीम सुरु होती. यापैकी Gal Constructor या मालवाहू नौकेवरील ( Barge ) सर्वच्या सर्व 137 लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या सर्व लोकांच्या नौकेला टो करत माहीम किनाऱ्यावर आणण्यात आले आहे. तर P 305 या मालवाहू नौकेवरील ( Barge ) 273 लोकांच्या सुटकेसाठी नौदलाचे प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आयएनएस कोलकता, आयएनएस कोची या युद्धनौकांनी काल सकाळपर्यंत 111 लोकांना वाचवले आहे.