मुंबई : धारावीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. आज धारावीत कोरोनाचे १६ रूग्ण मिळाले असून येथील अॅक्टीव्ह कोरोना रूग्णांची संख्या ५१ वर पोहचली आहे. यापूर्वी ३ डिसेंबरला १५ रूग्ण मिळाले होते. त्यानंतर आतापर्यंत १ अंकी संख्येत रूग्णवाढ होत होती. पण आज रुग्ण संख्या दोन अंकीवर गेली आहे.
दादरमध्ये आज १५ रूग्ण मिळाले असून येथील अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या १३२ झाली आहे. तर माहिममध्ये आज १३ रूग्ण मिळाले असून अॅक्टिव्ह रूग्णसंख्या १५० वर पोहचली आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. महापालिका कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. लोकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं जात आहेत. मुंबईच्या महापौर स्वत: रस्त्यावर उतरुन लोकांमध्ये जनजागृती करत आहेत.
धारावी सारख्या भागात कोरोना रुग्णांमध्ये होणारी वाढ निश्चितच चिंता वाढवणारा आहे. कारण या भागात दाटीवाटीने लोकवस्ती आहेत. त्यामुळे कोरोनाचा झपाट्याने संसर्ग होण्याची शक्यता येथे जास्त आहे. धारावी ही कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलं होतं. त्यामुळे प्रशासनाने येथे विशेष काळजी घेतली होती. पण आता धारावी, माहिम या भागात पुन्हा एकदा कोरोनाचा व्हायरस शिरकाव करताना पाहायला मिळत आहे.
राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. मुंबईसह इतर शहरात देखील रुग्णांमध्ये वाढ होत आहे.