stamp duty : नवीन फ्लॅट खरेदीवर आता इतके टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार, सवलत रद्द

स्टॅम्प ड्युटीवरील सवलत मागे

Updated: Mar 31, 2021, 07:14 PM IST
stamp duty : नवीन फ्लॅट खरेदीवर आता इतके टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार, सवलत रद्द title=

दीपक भातुसे, मुंबई : राज्य सरकारने मुद्रांक शुल्कातील सवलतीला मुदतवाढ न देण्याच्या निर्णय घेतला आहे. 3 महिने मुदतवाढ दिली जाईल असं बोललं जात होतं. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विरोध केल्यानंतर ही सवलत मागे घेण्यात आली आहे. त्यामुळे आता नवीन फ्लॅट घेताना आणखी पैसे मोजावे लागणार आहेत.

कोरोनामुळे ठप्प असलेल्या बांधकाम व्यवसायाला चालना देण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये दोन टक्के सवलत दिली होती. डिसेंबर 2020 पर्यंत 3 टक्के सवलत दिली होती. त्यानंतर मार्चपर्यंत 2 टक्के सवलत देण्यात आली होती. पण आता ही सवलत रद्द केली गेली असून आता पूर्ण 5 टक्के मुंद्रांक शुल्क (Stamp Duty) भरावे लागणार आहे.
 
मुंद्रांक शुल्कातील या सवलतीला मुदतवाढ दिली जाईल अशी चर्चा होती. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मुद्रांक सवलतीला 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. मात्र त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे मुद्रांक शुल्कात 2 टक्के दिलेली सवलत आज संपुष्टात येत आहे. 

अर्थ खात्याचा देखील मुदतवाढ देण्यास विरोध होता. त्यामुळे नवीन घर खरेदी करताना आता 5 टक्के मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे.