कोल्हापुरात रंगला झी २४ तास कोल्हापूर सन्मान सोहळा

कर्तुत्वान कोल्हापूरकरांचा सन्मान

Updated: Feb 21, 2020, 09:11 PM IST
कोल्हापुरात रंगला झी २४ तास कोल्हापूर सन्मान सोहळा title=

कोल्हापूर : कोल्हापुरात आज झी २४ तास कोल्हापूर सन्मान सोहळा पार पडला. कर्तृत्ववान आणि गुणवंत कोल्हापूरांचा यामध्ये सन्मान कऱण्यात आला. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमाला छत्रपती शाहू महाराज, पालकमंत्री सतेज पाटील, महापौर नीलोफर आजरेकर, खासदार संजय मंडलिक, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार ऋतूराज पाटील, कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, कोल्हापूर महापालिका आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते. 

लवकरच तुम्ही हा सोहळा झी २४ तासवर पाहू शकणार आहात.