Bee Attack Jalgaon : महाराष्ट्राच्या जळगाव एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. अंत्ययात्रा सुरु असताना नातेवाईक मृतदेह रस्त्यात टाकून वाट दिसेल तिथे पळत सुटले. याला कारण ठरल्या आहेत त्या मधमाशा. अचानक मधमाशांनी हल्ला केल्याने अत्यंयात्रेत सहभागी झालेले लोक वाट दिसेल तिथे पळत सुटले. मधमाशांच्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
जळगावच्या पारोळा तालुक्यात ही घटना घडली आहे. नगाव गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नगाव गावात स्मशान भूमीकडे नेत असताना अचानक मधमाधांचे पोळ उठले. अंत्ययात्रेत सहभागी नागरिकांवर अचानक मधमाशांनी हल्ला केला. यामुळे एक गोंधळ उडाला. मधमाशांनी हल्ला केल्यानंतर स्वतः चा बचाव करण्यासाठी अंत्ययात्रेत सहभागी झालेले शोकाकुल नातेवाईक आणि ग्रामस्थ शव सोडून वाट मिळेल तिकडे पळत सुटले.
या मधमाशांच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. साधु भागा भिल (वय 75), ओंकार शंकर भिल (वय 65) आणि मधुकर सजन भिल (वय 55) अशी जखमींची नावे आहेत. तिघेही नगाव येथील रहिवासी आहेत.
महाराष्ट्रातील एक लोकप्रिय ट्रेकिंग पाईंट असलेल्या कर्नाळ किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थी आणि इतर पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना 15 फेब्रुवारी रोजी घडली होती. कर्नाळा किल्ल्यावर40 ते 50 पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला. तर, पाच जण गंभीर जखमी झाले होते. मधमाशांच्या झुंडीने हल्ला केल्याने पर्यटक धावत सुटले. धावताना पडून नऊ जण जखमी झाले यात एका पर्यटकांचा मृत्यू झाल्याचे समजते.