vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत जागावाटपावरुन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील 36 जागांपैकी मविआतील शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ 2 जागा आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईतील 5 जागांसाठी शरद पवार राष्ट्रवादी पक्षानं आग्रह धरला होता.. मात्र अणुशक्ती नगर आणि घाटकोपर पूर्व या दोन जागा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळालीये. सध्या या दोन मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरु असल्याचीही माहिती सूत्रांनी दिलीये.
महाविकास आघाडीची जागावाटप संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. मागील आठवड्यात महाविकास आघाडीच्या मॅरेथॉन बैठका झाल्या. त्यानंतर पुन्हा एकदा सलग 2 दिवस मविआच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या जागावाटप संदर्भात बैठका होणार आहेत. मागील आठवड्यात तिन्ही पक्षांतील नेत्यांनी सर्व 288 जागांचा आढावा घेत चर्चा केली होती. मात्र त्यापैकी सुमारे 30 ते 35 जागांवर मविआतील पक्ष आग्रही आहेत. त्यामुळे तिढा असलेल्या या जागांवर आता दुस-या टप्प्यातील जागावाटपाच्या बैठकांमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळतेय.
पितृपंधरवाड्यानंतर महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत दोन दिवस बैठक होणार आहे. या बैठकीत बहुतांश जागांबाबत सहमती होईल अशी माहिती शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील यांनी दिलीय. जयंत पाटील शरद पवारांच्या भेटीला बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी ही महिती दिलीय.
इंदापुरातील हजारो कार्यकर्त्यांनी आज बारामतीमध्ये शरद पवारांची भेट घेतली.. इंदापुरात आयात उमेदवारांना संधी देऊ नका अशी मागणी कार्यकर्त्यांनी केल्याची माहिती यावेळी सूत्रांनी दिलीये... इंदापुरात राष्ट्रवादी शरदचंत्र पक्षाचे प्रवीण माने आणि आप्पासाहेब जगदाळे हे विधानसभा निडणूक लढण्यास इच्छुक आहेत.. तसंच हर्षवर्धन पाटीलही हाती तुतारी घेण्याची शक्यात आहे.. मात्र सर्वांचा विचार घेऊनच उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं...