मुंबई-गोवा महामार्गावरील दुचाकी अपघातात दोन ठार

मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडजवळ केंबुर्लीत झालेल्‍या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. 

Updated: Nov 24, 2017, 10:05 PM IST

अलिबाग : मुंबई-गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील महाडजवळ केंबुर्लीत झालेल्‍या अपघातात दुचाकीवरून प्रवास करणारे दोन तरुण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. 

मंगेश बोराडे आणि विशाल शिंदे अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. केंबुर्लीमध्ये वळणावर मिनी स्‍कूलबस आणि केटीएम दुचाकी यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. 

अपघातात जखमी झालेल्‍या स्‍कूलबस चालकाला उपचारासाठी रुग्‍णालयात हलवण्‍यात आलंय. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्‍कळीत झाली होती.