अमरावती मार्गावर ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात

अमरावती मार्गावर आठवा मैलजवळ ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात झाला आहे.

archana harmalkar अर्चना हरमलकर | Updated: Dec 4, 2017, 11:17 AM IST
अमरावती मार्गावर ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात  title=

अमरावती : अमरावती मार्गावर आठवा मैलजवळ ट्रक- अम्ब्युलन्समध्ये भीषण अपघात झाला आहे.

अपघातात ४ ठार

आठवा मैलजवळ झालेल्या या अपघातात ४ जणांचा मत्यू झाला आहे. अकोल्याहून एका बालकाला उपचारासाठी आणत असताना पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. 

ट्रक चुकीच्या दिशेने येत होता

ट्रक चुकीच्या दिशेने येत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. बारा वर्षीय आकाश भालेराव  त्याची आई विमल भालेराव आणि  त्यांच्याबरोबर प्रवास करणारे श्रीराम धारपवार अशी मृतांची नावं आहेत. या अपघातात आणखी चार जण जखमी झाले आहेत.