पावसामुळे जुना कसारा घाट खचला

रस्ता खचल्याने घाटातील एक मार्ग बंद

Updated: Jul 28, 2019, 03:21 PM IST
पावसामुळे जुना कसारा घाट खचला title=

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे जुन्या कसारा घाटातील रस्ता खचला आहे. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक सध्या मंदावली आहे. 

नाशिकच्या दिशेने जाणारी एक लेन बंद करण्यात आल्यामुळे इथली वाहतूक मंदावली आहे. कसारा घाटामध्ये दोन मार्गिका आहेत. त्यापैकी घाटतून वर जाणारी मार्गिका जुना कसारा घाट म्हणून ओळखली जाते. या घाटातील रस्त्याला तटे गेले आहेत. त्यामुळे एक मार्गिका बंद करण्यात आहे. मात्र, एकेरी वाहतूक सुरु आहे. 

शुक्रवारपासून सतत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्याला तडे गेले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बॅरिकेट, फलक लावण्यात आले आहेत. मात्र, प्रवाशांनी घाटात काळजीपूर्वक प्रवास करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.