पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या आईला अटक

आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादाय घटना नुकतीच समोर आली आहे.  मुलगी वयात आल्यावर ज्या आईने तिला चांगल्या-वाईटाची जाणीव करुन द्यायला हवी होती त्याच आईने कुकृत्य केले आहे. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Aug 12, 2017, 05:18 PM IST
पोटच्या मुलीला वेश्याव्यवसायास लावणाऱ्या आईला अटक

ठाणे : आई-मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादाय घटना नुकतीच समोर आली आहे.  मुलगी वयात आल्यावर ज्या आईने तिला चांगल्या-वाईटाची जाणीव करुन द्यायला हवी होती त्याच आईने कुकृत्य केले आहे. 

एका आईनेच पोटच्या 22 वर्षीय मुलीला पैशांचे आमिष दाखवून मागील  सहा महिन्यांपासून वेश्यागमनास लावल्याची बाब ठाण्यात उघडकीस आली आहे.  
गीता उर्फ संध्यादेवी शर्मा असे या आरोपी महिलेचे नाव आहे. गीता ही दलाल असून ती मुळची उत्तरप्रदेश येथील आहे. गीताबाबत अधिक माहिती पोलीस गोळा करीत आहेत.  ठाण्यातील तलावपाळी येथे गीता ही वेश्याव्यसावयासाठी काही महीला घेऊन उभी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक विभागाने आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली.  नियोजनबद्धरीत्या रचलेल्या जाळ्यात गीता फसली आणि पोलिसांच्या तावडीत सापडली. शुक्रवारी रात्री  वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविन्द्र दौंडकर यांच्या पथकाने छापा टाकून तिला ताब्यात घेतले. तसेच त्या मुलीस आणखी एका महिलेची सुटका केली. 

गीताला अटक केल्यानंतर तिच्याकडून महत्त्वाची माहीती समोर आली आहे. शरीर संबंधाकरीता माहिलांची मागणी केल्यास 2000 रुपये घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. या करवाईत 5070 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून नौपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर अजुन कोणते रॅकेट सक्रिय आहेत याची माहिती पोलीस घेत आहेत.