SSC Exam : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी दहावीची (SSC Exam) परीक्षा आजपासून (2 मार्च) सुरू होत आहे. सकाळी 11 ते 2 या दरम्यान पहिला मराठीचा पेपर घेण्यात येणार आहे. यावर्षी तब्बल 15 लाख 77 हजार 256 विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. तसेच राज्यातील 533 परीक्षा केंद्र सज्ज असून परीक्षेची निेयोजन पूर्ण झाले आहे.
दरम्यान विद्यार्थांना बारावीप्रमाणेच दहावीला वाढीव 10 मिनिटे मिळतीलय. दहावीच्या प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रांवर नेताना जीपीएस ट्रॅकिंग केले जाईल. प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना वितरित करतानाही चित्रीकरण करण्यात येईल. तसेच गैरप्रकार रोखण्यासाठी कॉपीमुक्त अभियानांतर्गत परीक्षा केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त ठेवला जाईल.
वाचा: कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीची आज मतमोजणी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला