पुणे : बुधवारी, पुण्यात झालेल्या 'शोध मराठी मनाचा' या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी 'वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न असल्याचं' आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं. यासाठी 'वेगळा विदर्भ'वाद्यांनी तिखट प्रतिक्रिया नोंदवलीय.
इतकंच नाही, तर वेगळ्या विषयी विदर्भातल्या जनतेचा कौल घ्या, असंही त्यांनी आपल्या भाषणात सुचवलंय. 'वेगळा विदर्भ हे अमराठी नेतृत्वाचं स्वप्न आहे. स्वतंत्र विदर्भाबद्दल लोकमत घ्या... पण, हे कुणी करणार नाही कारण त्यांना माहीत आहे फार प्रतिसाद मिळणार नाही... वेगळ्या विदर्भाची मागणी ही मुख्यत्वे ठराविक हिंदी भाषिक जिल्ह्यांचीच आहे' असं पवार यांनी म्हटलंय.
दरम्यान, पवारांच्या या विदर्भाविषयीच्या विधानाबद्दल विदर्भवाद्यांनी असहमती दर्शवलीय. मुळात विदर्भाची मागणी संस्कृतीच्या आधारे असल्याचं मत ज्येष्ठ विदर्भवादी नेते श्रीहरी अणे यांनी 'झी 24 तास'शी बोलताना म्हटलंय. काय म्हटलंय अणेंनी... ऐकुयात त्यांच्याच शब्दात...