village in Maharashtra: सापाला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. काही ठिकाणी सापाला दैवत म्हणून पुजतात. हिंदु पुराणानुसार, भगवान शिव यांच्या मानेभोवतीही साप वेटोळे घालून बसला आहे. प्रत्येक वर्षी नागपंचमीच्या सणाला भारतीय शहरा-शहरांत गावांत मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हजारो भक्त सापांची पूजा करतात त्यांना दूध-लाह्यांचा नैवेद्य चढवतात. पण एकीकडे हे सण संपल्यानंतर शेतात किंवा घरात साप सापडला तर मात्र घाबरून दूर पळतात किंवा सापाला हुसकावून लावतात. साप हा विषारी प्राणी असल्याने जवळ आल्यास घाबरगुंडी उडते. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे लोक सापांसोबत राहतात. ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटलं ना? जाणून घ्या.
पुण्यापासून जवळपास 200 किमी लांब असलेल्या शेलापुर जिल्ह्यातील शेटफळ नावाचे एक अनोखे गाव आहे. जिथे लोक सापांसोबत राहतात. इतकंच नव्हे तर, इथे सापांची फक्त पूजाच केली जात नाही तर लोक त्यांना घरात आसरादेखील देतात. शेटफळ हे एक असं गाव आहे जिथे सापा सहज फिरत असतात आणि कोणीच त्यांना हटकत नाही. आश्चर्यांची बाब म्हणजे, या गावात 2,600 पेक्षा जास्त ग्रामस्थ आहेत. मात्र कोणलाही कोणत्या प्रकारचे नुकसान पोहोचवत नाही. महाभयंकर कोब्राचेही इथे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले जाते. इथले गावकरी ना सापांना घाबरतात ना नागांना घाबरत. कारणहे साप देखील कोणालाच डसत नाहीत.
शेटफळमधील ग्रामस्थांना सापाच्या वावरण्याची इतकी सवय झाली आहे की या विषारी प्राण्यासोबत ते बिनदिक्कत राहतात. इतकंच नव्हे तर, येथील स्थानिक नागरिक जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा घरातील एक कोपरा अशा पद्धतीने तयार करतात जेणेकरुन येथे साप येऊन राहू शकतील. गावातील कोणताही रहिवाशी घर बांधत असेल तर सापांसाठीदेखील व्यवस्था करतात.
गावकरी सापाला पाळीव प्राणी मानतात. या गावातील लहान मुलं शाळेत जातानाही सापाला सोबत घेऊन जातात. लहान मुलांनाही सापांची भीती वाटत नाही. कारण लहानपणापासूनच त्यांनी या प्राण्याला त्यांच्या आजूबाजूला फिरताना पाहिलं आहे. साप मुलांनाही डसत नाही. त्यांना काहीच दुखापत करत नाही. गावकऱ्यांव्यतिरिक्त जर कोणी दुसरा बाहेरचा व्यक्ती या गावात आला तर त्याला या गावात फिरणे थोडे कठिण होऊ शकते.
कारण पहिले तर त्याच्या मनातील भिती. त्यामुळं सापांना पाहून तो घाबरू शकतो. पण गावकऱ्यांनी सापासोबत कशी मैत्री केली आणि गावात हे कधीपासून सुरू झालं हे मात्र अद्याप कळलं नाहीये.