गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली: वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात. त्यातून त्यांची संस्कृती वेगळी, परंपरा वेगळी (Different Culture in Maharashtra) परंतु अशी अशा विविध ठिकाणच्या संस्कृती (Hingoli Yatra) आपल्याला कायमच आकर्षित करत असतात सध्या हिंगोली जिल्ह्यातही अशाच प्रकारे एक यात्रा साजरी केली जाते. या यात्रेचे वैशिष्ट्यंही वेगळं आहे. त्याचसोबत या यात्राला एक वेगळी परंपराही आहे. ही यात्रा गेली 531 वर्षे सुरू असून या यात्रेनं सगळ्याचेच लक्ष वेधले आहे. (Sarang Swami Yatra 2023 maha prasad of 150 qt of vegetables for devotees maharashtra news)
हिंगोली जिल्ह्यात तब्बल 531 वर्षाची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या सारंगस्वामी महाराजांची भाजीची यात्रा प्रसिद्ध आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडी शिवारात वीरशैव समाजाच्या वतीने सारंगस्वामी महाराजांची यात्रा मकर संक्रांतीच्या (Makarsankrant) दुसर्या दिवशी भरवली जाते. या यात्रेच खर आकर्षण म्हणजे बारा वेगवेगळ्या भाज्या मिळून दिडशे क्विंटल भाज्यांचा महाप्रसाद येथे भक्तांना वाटला जातो. महाराष्ट्र आणि कर्नाटकामधून लाखो भक्त या भाजीचा महाप्रसादाचा घेण्यासाठी येथे गर्दी करीत असतात.
हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील सारंगवाडीच्या वीरशैव समाजाचे सद्गुरु सारंगस्वामी महाराज यांची घेतलेली संजीवनी समाधी येथे आहे. त्या निमित्तानं गेल्या 531 वर्षापासुन येथे स्वामींची यात्रा आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. यात्रेच मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे येथे विविध प्रकारच्या कच्या भाज्या एकत्रित करून त्याचा महाप्रसाद केला जातो. या भाजीचा (Prasad) आस्वाद घेण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून भाविक येथे गर्दी करीत असतात. सहकुटुंब मित्र परिवारासोबत येथे वेळ घालून पार्टी केल्याचा आनंद ही कुटुंबीयांना घेता येतो. त्यामुळे सारंग स्वामीची ही यात्रा अनेकांसाठी आनंदाची पर्वणी ठरत आहे.
सध्या या यात्रेला भाविक खूप मोठ्या संख्येन गर्दी करत आहेत. त्यांना या यात्रेला भेट दिल्याचे फार समाधान होत असून येथे येणारे भाविक हे अनेकदा येथे आले असल्याने इकडच्या यात्रेकरूंना या प्रसंगी खूप आनंदही होतो आहे. काही लोकांना नव्याने या यात्रेबद्दल माहिती मिळाली तर काहींना अशावेळी पुन्हा या यात्रेला येण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
या यात्रेला दिला जाणारा महाप्रसाद या यावेळी 180 क्विंटलच्या वर होता. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीच्या भाज्या आणल्या होत्या. या सर्वांनी या यात्रेचा आनंद लुटला होता. अशाप्रकारच्या जत्रा (Jatra) महाराष्ट्रात होताना दिसतात आणि त्याला मोठ्या संख्येनं उपस्थितीत असते. या यात्रेतील लोकांच्या सहभागामुळे पुन्हा त्याची प्रचिती आलेली दिसते आहे.