वाल्मिक कराडच्या पापाचा घडा भरला? 15 जुन्या गुन्ह्यांची कसून चौकशी होणार

Walmik Karad : संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील चार आरोपींना बीड शहर पोलीस ठाण्यातून इतर ठिकाणी हलवण्यात आलंय. वाल्मिक कराडला बीडमधील तुरुंगात आणण्यात आलं..त्यामुळे इतर चार आरोपींना इतर ठिकाणी हलवण्यात आलं. 

वनिता कांबळे | Updated: Jan 1, 2025, 09:08 PM IST
वाल्मिक कराडच्या  पापाचा घडा भरला? 15 जुन्या  गुन्ह्यांची कसून चौकशी  होणार title=

Santosh Deshmukh Murder Case :  वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर पुढं काय होणार असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. वाल्मिक कराडला अजूनही संतोष देशमुख हत्या प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेलं नाही. सीआयडी आता वाल्मिकची चौकशी करतेयं. देशमुख हत्या प्रकरणात कराड लिंक काय आहेत याचा तपास सुरु आहे. शिवाय वाल्मिकच्या यापूर्वीच्या 15 गुन्ह्यांमध्येही त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे.

हे दखील वाचा... वाल्मिकच्या शरणागतीची स्क्रिप्ट कुणी लिहिली? शरणागतीसाठी वाल्मिकनं सेटिंग केल्याचा आरोप

वाल्मिक कराडला सीआयडीनं पवनचक्की खंडणी प्रकरणात अटक केलीय. खरं तर वाल्मिक कराड हा संतोष देशमुख हत्येप्रकरणातला संशयित आहे. वाल्मिकचे संतोष देशमुख प्रकरणातलं कनेक्शन शोधणं सीआयडीसमोर आव्हान असणार आहे. 
संतोष देशमुखांच्या हत्येवेळी वाल्मिक कराड कुठं होता? आरोपींनी हत्येवेळी वाल्मिक कराडला फोन केला होता का? संतोष देशमुखांना वाल्मिक कराडनं धमकावलं होतं का? फरार आरोपींच्या वाल्मीक कराड संपर्कात होता का? वाल्मिक कराडशिवाय आणखी कोण या हत्येत आहे का? हे तपासणं सीआयडीसाठी आव्हान असणार आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधिमंडळात घोषणा केल्याप्रमाणं पोलीस महानिरीक्षक बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी गठीत करण्यात आलीये. त्यांच्या टीममध्ये दहा सर्वोकृष्ट अधिकारी दिल्याची माहिती आहे. सीआयडीनं वाल्मिक कराडला अटक केली. मात्र त्याला अजूनही संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी केलेलं नाही. सीआयडी आणि पोलीस त्याला सहआरोपी करतात का याकडं देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांचं लक्ष लागलंय. वाल्मिक कराडवर यापूर्वी 15 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळं त्या गुन्ह्यांमध्ये चौकशीसाठी वाल्मिकला पुन्हा अटक केली जाण्याची शक्यता आहे. संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिकला सहआरोपी करतात की नाही त्यावर वाल्मिकचं भवितव्य ठरणार आहे.