रत्नागिरी : रत्नागिरीतल्या नाणार रिफायनरी प्रकल्पाला होत असलेला विरोध लक्षात घेता, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्थानिकांशी संवाद साधण्याचा निर्णय घेतलाय.
आज राज ठाकरे रत्नागिरी जिल्ह्याचा दौरा करणार असून, त्यावेळी ते नाणारला भेट देणार आहेत. त्यानंतर राज ठाकरे या प्रकल्पाबाबत आपली भूमिका जाहीर करतील. नाणार रहिवाशांनी अलीकडेच राज ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली होती.
दरम्यान, नाणार प्रकल्पावरून कोकणात राजकीय वातावरण तापलंय. शिवसेना विरुद्द नारायण राणे असा संघर्ष इथं पाहायला मिळतोय. अशा वातावरणात राज ठाकरे नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष असणार आहे.