रत्नागिरी : पहिल्याच अवकाळी पावसात मुंबई-गोवा हायवेचे तीन तेरा वाजलेत आहे. चिपळूणच्या परशुराम घाट मुख्य रस्त्यावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. मुसळधार पावसाने झोडपले त्यामुळे महामार्गावर माती मिश्रीत चिखलच दिसून येत आहे.
मुंबई-गोवा हायवेचे काम गेले दोन वर्ष संथगतीने चालू आहे अनेकदा दरड कोसळून रस्त्यावरती चिखल माती येते व मुख्य हायवेवर अनेकदा वाहतूक कोंडी पाहायला मिळते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक बंद आहे तरीही जीवनावश्यक वस्तूंसाठी, धान्यांचे ट्रक आंबा वाहतूक या महामार्गावरुन सुरु आहे. तसेच रुग्णवाहिके सारख्या अत्यावश्यक गोष्टींसाठी वाहतूक देखील याच महामार्गावरुन सुरु आहे.
काल कोसळलेल्या पावसामुळे चिपळूण -खेड परिसरात झालेल्या पावसामुळे मुंबई-गोवा हायवे वरती परशुराम घाट येथे मोठ्या प्रमाणात माती, दगड रस्त्यावर वाहून आली त्यामुळे रस्त्याची अशी दुरावस्था झालेली दिसून आली वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून रस्त्यावर आलेली माती काढण्यासाठी प्रशासन काम करीत आहे. वाहतूक संथगतीने चालू आहे. मात्र पहिल्याचअवकाळी पावसात महामार्गाची दैनीय अवस्था झालेली पाहायला मिळाली आहे.