धुळ्यात अवकाळी पावसामुळे एकाचा मृत्यू

अवकाळी पावसामुळे ८ जण जखमी आहेत  

Updated: Mar 18, 2020, 10:03 AM IST
धुळ्यात अवकाळी पावसामुळे एकाचा मृत्यू title=

धुळे : धुळे आणि जळगावातही अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे शिरपूरमध्ये एकाचा मृत्यू तर ८ जण जखमी झालेत. त्यातल्या ५ जणांची प्रकृती गंभीर आहे. अवघ्या २० मिनिटांच्या पावसात कोट्यवधींचं नुकसान झालंय. गहू, केळी, हरभरा, मका पिकं अक्षरश: भूईसपाट झालीत. धुळे तालुक्यातही काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड, जामनेर भागातही अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीटही झाली आहे. पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट उभं राहिलंय. 

अकोल्यातही जोरदार गारपीट

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील वडाळी पिंपरी या परिसराला मंगळवारी संध्याकाळी गारपिटीसह पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यामुळे मोठ्या प्रमाणात गहू , केळी व इतर फळबागांचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे.