महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याला गोव्यापेक्षा जास्त पसंती; जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण

Nashik Wine Yards :  महाराष्ट्रात एक असा जिल्हा आहे जो जगभरातील मद्यप्रेमींना आकर्षित करतो.  हा जिल्हा गोव्याला टक्कर देतो. 

वनिता कांबळे | Updated: Dec 15, 2024, 11:29 PM IST
 महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्याला गोव्यापेक्षा जास्त पसंती; जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण title=

Nashik Wine Tourism, Nashik Wine Yards : गोवा म्हंटलं की डोळ्यांसमोर येतो निळाशार समुद्रकिनारा, क्रूझवरची मौजमजा आणि दारूची नशा. गोव्यात दारू स्वस्त दरात मिळते. अनेकजण मौजमजा करण्यासाठी गोव्याला जातात. दारू पिणा-यांसाठी गोवा म्हणजे नंदनवनच. मात्र, महाराष्ट्रात एक जिल्हा असा ज्याला गोव्यापेक्षा जास्त पसंती मिळते. महाराष्ट्रातील हे ठिकाण जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण आहे. जाणून घेऊया ठिकाण कोणते. 

हे देखील वाचा... महाराष्ट्रातील सर्वात मोठा समुद्र किनारा; मुंबईपेक्षा पुण्यावरुन जास्त जवळ आहे 

जगभरातील मद्यप्रेमींचे आवडते ठिकाण असलेला महाराष्ट्रातील या जिल्ह्याचे नाव आहे नाशिक. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय धार्मिक स्थळ म्हणूनही नाशिक जिल्हा ओळखला जातो.  त्र्यंबकेश्वर, वणीची सप्तश्रृंगी, शिर्डीतलं साईदर्शन, गंगापूर धरण, ब्रह्मगिरीचा ट्रेक,  नांदूरमध्यमेश्वरचं पक्षी अभयारण्य, राजापूरची हरणं, सुला वाईन्स, येवल्याची पैठणी ही नाशिकमधील लोकप्रिय पर्यटन स्थळ आहेत. 

भारतात जवळपास  95 वायनरीज आहेत. तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा वाइन कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखला जातो. देशात असलेल्या 95 वायनरीजपैकी 45 वायनरीज एकट्या नाशिक जिल्ह्यात आहेत.  गंगापूर, गंगावणे, गिरणा, सावरगाव या भागांत या सर्व वायनरीज आहेत.  नाशिकमधून दरवर्षी दोन कोटी लिटरहून अधिक वाइनचे उत्पादन घेतले जाते. याशिवाय नाशिकमध्ये वाइन उद्योग हा वाईन टूरीजम म्हणून लोकप्रिय झाला आहे. वायनरीजची पाहणी करण्यासाठी तसेच वाइन फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक नाशिक जिल्ह्याला भेट देतात. यामध्ये विदेशी पर्यटकांची लक्षणीय आहे. 

नाशिकमध्ये अनेक वायनरीज आहेत. या वायनरीजला भेट देणाऱ्या पर्यटकांना विविध प्रकारच्या वाईनचा आस्वाद घेता येतो. तसेच येथे पर्यटकांना संपूर्ण वायनरीची टूर करता येते. वाईन कशा प्रकारे बनवली जाते हे देखील पर्यटकांना पाहता येते. येथे पर्यटकांना राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट देखील आहेत. अनेक वायनरीज या द्राक्ष बागांजवळ तसेच निसर्गाच्या सान्निध्यात आहेत. 

सुला वाईनयार्ड्स (Sula Vineyards), यॉर्क वाईनरी (York Winery),सोमा वाईनयार्ड्स (Soma Vineyards), सोमा वाईनयार्ड्स (Soma Vineyards), टायगर हिल वाईनयार्ड्स रिसोर्ट (Tiger Hill Vineyards Resort), विनसुरा वाईनयार्ड्स (Vinsura Vineyards) या नाशिकमधील लोकप्रिय वायनरीज आहेत.  थर्टी फस्टच्या सेलिब्रेशनसाठी पर्यटकांनी नाशिकच्या वाईन यार्डला पसंती देतात.