दारूची नशा चढली...गाडी रिव्हर्स करताना 3 मित्रांना चिरडलं, पाहा अपघाताचा भीषण व्हिडीओ

दारूच्या नशेत घेतला टर्न...तीन मित्रांच्या जीवावर बेतला...पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ

Updated: Dec 19, 2021, 04:53 PM IST
दारूची नशा चढली...गाडी रिव्हर्स करताना 3 मित्रांना चिरडलं, पाहा अपघाताचा भीषण व्हिडीओ

अमर काणे, झी 24 तास नागपूर : दारू पिऊन गाडी चालवण्यासाठी बंद आहे. ह्या नियमाला कचऱ्य़ाची टोपली दाखवून एक तरुण गाडी चालवायला निघाला. या कार चालकानं नशेत दोघांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

दारूच्या नशेत कार रिव्हर्स घेताना बाकावर बसलेल्या आपल्या तीन मित्रांना कार चालकानं उडविल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार नागपुरातील सावनेर इथे घडला आहे. शनिवारी दुपारी चारच्या सुमारास ही घटना सानेर इथल्या एका ढाब्यासमोर घडली. 

ह्या व्यक्ती आंध्र प्रदेशातल्या असून त्या ढाब्यावर थांबले होते. तिथे जेवण आणि दारू घेतल्यानंतर तिन मित्र अगोदर पानठेल्याजवळच्या बाकावर जाऊन बसले होते. तर चौथा मित्र कार काढत होता.

दारूच्या नशेत कार रिव्हर्स घेताना त्याचं नियंत्रण सुटलं. आणि रिव्हर्स कार बाकावर बसलेल्या मित्रांच्या अंगावर गेली. या विचीत्र अपघाताची ही सर्व घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे.