नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग, 'अशी' ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी

Nagpur Crime: गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नव नवे फंडे वापरतात. असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय. 

Pravin Dabholkar | Updated: Dec 13, 2024, 07:40 PM IST
नागपुरात दरोडेखोरांची वॉकीटॉकी गँग, 'अशी' ठरायची दरोड्याची मोडस ऑपरेंडी title=
नागपूर वॉकीटॉकी गॅंग

Nagpur Crime: दरोड्याच्या तयारीत असलेल्या एका टोळीला नागपूर पोलिसानी अटक केलीय.अटकेनंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत दरोडेखोराकडून धक्कादायक माहिती समोर आलीय.हे चोरटे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी चक्क वॉकीटॉकीचा वापर करायचे. गुन्हेगार कितीही शातिर असला तरीही. गुन्हा कधीही लपून राहत नाही.

गुन्हेगार पोलिसांना गुंगारा देण्यासाठी नव नवे फंडे वापरतात. असाच एक वेगळा फंडा वापरणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळाला नागपूरच्या हुडकेश्वर पोलिसांनी गजाआड केलंय. वॉकीटॉकी टोळी नागपुरात धुमाकूळ घालतेय. पोलिसांना गुंगारा देण्यासाठी ही टोळी दरोड्याच्या आधी आणि दरोड्याच्या नंतर मोबाईल ऐवजी वॉकीटॉकीचा वापर करत होती.
 
वॉकीटॉकीच्या वापरामुळे लोकेशन ट्रॅक होण्याचा प्रश्न नव्हता आणि पोलिसांच्या हाती सापडण्याचा धोकाही कमी होती. नवीन सुभेदार परिसरात एका व्यापाराच्या घरी दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी या पाच जणांच्या टोळीला अटक केलीय.या टोळीकडून 3 वॉकीटॉकी, एक पिस्तूल, चार जिवंत काडतूसं, धारदार शस्त्र आणि  मोबाईल फोन जप्त करणेत आलेत. घरफोडी,दरोडा आणि अपहरणासाठी या टोळीकडून वॉकीटॉकीचा वापर केला जायचा. वॉकीटॉकीची रेंज 3 किमी पर्यंत होती. गुन्हा करताना किंवा केल्यानंतर दबा धरून बसलेल्या साथीदारांशी संपर्क करायचे. वॉकीटॉकीवर संपर्क करून आजुबाजुच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे. अनेक गुन्ह्यांमध्ये वॉकीटॉकीच्या आधारे पोलिसांना गुंगारा दिला जायचा. 

अटक करण्यात आलेल्याया टोळीत मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रातील दरोडेखोरांचा समावेश आहे. या चोरट्यांच्या रडारवर नागपुरातील काही श्रीमंत कुटुंबं होती. त्यांच्या घरांची दरोडेखोरांनी रेकी केली होती. आतापर्यंत पोलीसच वॉकीटॉकीचा वापर करत होते. आता दरोडेखोरही वॉकीटॉकीचा वापर करु लागल्याचं या प्रकरणाच्या निमित्तानं समोर आलंय. नागपूरमध्ये मुसक्या आवळलेले हे दरोडेखोर हायटेक तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांच्या हाती तुरी देण्याचा प्रयत्न करत होते.मात्र नागपूर पोलिसांनी त्यांचा हा डाव उधळत त्यांच्या मुसक्या आवळल्या.

नातेवाईंकामुळं भोंदूबाबाचा डाव उधळला

साताऱ्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  दहिवडी पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदी बु. गावातील वृद्ध महिला व्दारकाबाई कुचेकर यांना फसवणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे असं या भोंदुबाबाचे नाव आहे. एकनाथ रघुनाथ शिंदे हा बाबा म्हणून परिसरात वावरत असतो. त्याने व्दारकाबाईच्या घरावर आणि प्रॉपर्टीवर कब्जा करण्यासाठी तिच्या मुलाच्या नावावर कागदपत्रे तयार केली होती. वृद्ध महिला मयत झाल्यानंतर भोंदूबाबाने तिच्या नातेवाईकांना सांगितले की, तोच तिचा मुलगा सोमनाथ कुचेकर आहे. मात्र नातेवाईकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी याबाबत पोलिसांत माहिती दिली. तेव्हा या भोंदूबाबाचा कट उघड झाला. द्वारकाबाई यांच्या नावावर तीन एकर जमीन असल्याचे त्याला समजले होते. त्याचा फायदा घेण्यासाठी त्याने हा कट रचला. द्वारकाबाई यांनाही तो वरचेवर भेटू लागला होता. मात्र 9 डिसेंबर 2023 मध्ये द्वारकाबाई यांचे निधन झाले. तर, नातेवाईकांनी 27 नोव्हेंबर 2024 साली त्यांचे वर्षश्राद्ध केले. तेव्हा एकनाथ याने मीच सोमनाथ असून द्वारकाबाई यांचे श्राद्ध घालणार असल्याचे सांगितले. तेव्हा नातेवाईकांना त्याच्या संशय आला. त्यांनी या बाबत पोलिस ठाण्यात कळवले.