Crime News : महाराष्ट्र हादरला..! नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार

महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला अटक केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Feb 9, 2025, 03:15 PM IST
Crime News : महाराष्ट्र हादरला..! नागपुरात महिलेची हत्या करुन मृतदेहावर बलात्कार title=

Nagpur Crime News : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. नागपुरात विवाहितेने प्रेमास नकार दिल्याने तिची हत्या करून मृतदेहावर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर भागात ही अमानवीय घटना घडली आहे. महिलेची मुलगी शाळेतील घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. 

नागपुरात एका 33 वर्षीय महिलेवर आरोपीने बलात्कार केल्यानंतर तिचा खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलेली आहे. शवविच्छेदन अहवालात मृतदेहावर बलात्कार झाल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता पोलिसांनी एका 25 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा मृतक महिलेच्या कुटुंबाशी परिचित होता. दरम्यान याबाबत आरोपीने महिलेची हत्या केल्यानंतर अत्याचार केल्याचे पोलीस चौकशीत कबूल केले.  आरोपीचा संतापजनक आणि घृणास्पद कृत्य पाहून पोलिसही चक्रावले आहेत. 

हे देखील वाचा... Pune Crime : दोन लेकरांना झोपेतच संपवलं, पतीवर कोत्याने वार केले; महिलेचे भयानक कृत्य पाहून पोलिसही हादरले

रोहित टेकाम असे आरोपीचे नाव आहे.  आरोपी रोहित पेंटिंगचे काम करत होता. रोहित आणि हत्या झालेल्या महिलेची एक-दीड वर्षांपूर्वी कामाच्या ठिकाणी ओळख झाली. त्यातून दोघांमध्ये मैत्री झाली होती. घटनेच्या दिवशी आरोपी रोहितने त्या महिलेला फोन केला असता त्यास समजले की महिला घरी एकटीच आहे. त्यानंतर रोहित हा महिलेच्या घरी गेला इथे आरोपीने मद्य प्राशन केले. दारूच्या नशेत आरोपी रोहितने महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली. मात्र, महिलेने स्पष्ट नकार दिल्याने चिडलेल्या आरोपी तिच्यावर जबरदस्ती केली.यानंतर त्याने महिलेचा  तिची गळा आवळून हत्या केली. ऐवढ्यावरच न थांबता आरोपी रोहितने महिलेच्या मृतदेहावर बलात्कार केला. 

शवविच्छेदन अहवालात बलात्कार व हत्येची बाब पुढे येताचं पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असता त्या दिवशी महिलेच्या घरी रोहित आला असल्याचे समजले. त्यानंतर पोलिसांनी रोहित टेकामचा शोध घेऊन अटक केली असता आरोपीने गुन्हा मान्य केल आहे.  न्यायालयाने आरोपीला 11 पर्यत पोलीस कोठडी सुनावणी आहे. आरोपी रोहित याने हे कृत एकट्याने केले की त्याच्या सोबत आणखी कुणी होतं का याचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.