अनैतिक संबंधातून पिंपरी चिंचवडमध्ये तरुणाची हत्या

पिंपरी चिंचवडमध्ये कराची चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.

Updated: Jun 28, 2017, 09:21 AM IST

पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये कराची चौकात एका तरुणाची हत्या करण्यात आलीय.

सागर अरुण थोरात असं या २८ वर्षीय मृत तरूणाचं नाव आहे.

या प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आलीय. अर्चना जालिंदर निकम, तिचा भाऊ रवींद्र, एक साथीदार गणेश कांबळे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. 

अनैतिक संबंधातून ही हत्या झाल्याची माहिती मिळतेय. पोलिसांचा अधिक तपास सुरु आहे.