मुंबई - गोवा महामार्गावर अॅसिड टॅंकरला अपघात, वाहतूक पूर्णपणे ठप्प

मुंबई - गोवा महामार्गावर खेड आयनी येथे अॅसिड टॅंकरला अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. 

Updated: Dec 24, 2017, 09:22 AM IST
मुंबई - गोवा महामार्गावर अॅसिड टॅंकरला अपघात, वाहतूक पूर्णपणे ठप्प

रायगड : मुंबई - गोवा महामार्गावर खेड आयनी येथे अॅसिड टॅंकरला अपघात झाल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे. अॅसिड टॅंकर पलटी झाल्याने अॅसिडचा धोका वाहतूक रोखण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या तीन तासापासून येथील वाहतूक पूर्णत: ठप्प आहे.  

महामार्गावर वाहतूक पूर्णपणे ठप्प 

खेड लोटे औद्योगिक वसाहतीजवळील आयनी येथे अॅसिडचा टँकर उलटल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. क्रेनच्या साहाय्याने टँकर हटवण्याचे काम सुरू आहे.

दोन दिवसांपासून गाड्यांची गर्दी

सलग सुट्या असल्यामुळे कोकणात जाणाऱ्यांनी गर्दी केली आहे. त्यामुळे महामार्गावर दोन दिवसांपासून गाड्यांची वाहतूक वाढली आहे. या होणाऱ्या गर्दीमुळे अपघाताने भर टाकली आहे. त्यामुळे वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला आहे.

 मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरही कोंडी

दरम्यान, सुट्टीचा परिणाम मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरही दिसून येत आहे. सलग दुसऱ्या दिवशी वाहतूक संथगतीने सुरु आहे. अमृतांजन पुल ते खोपोली एक्जिट येथे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे.