Marathi Sahitya Sammelan : दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाची जोरदार चर्चा रंगली आहे. अशातच मराठी भाषा विभागाने मोठा निर्णय जाहीर केला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच साहित्य संमेलन ऑन व्हील्स ही संकल्पना राबवली जाणार आहे. 1200 साहित्यीकांच्या उपस्थितीत ट्रेनमध्येच सहित्य संमेलन रगंणार आहे,
येत्या 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्घाटनाला उपस्थित राहणार आहेत. तर, साहित्य संमेलनाच्या समारोपाला अजित पवार आणि एकनाथ शिंदे उपस्थितीत होणार आहे. मराठी लोकसाहित्य, लोकसंस्कृती, परंपरा आणि नाट्यकला या विषयांच्या तज्ज्ञ व प्रख्यात लेखिका तारा भावळकर या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत.
ट्रेननध्येच साहित्य संमेलन रंगणार आहे. 1200 साहित्यिक ट्रेनने दिल्लीला जाणार आहेत. ट्रेनच्या बोगीत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. मराठी भाषा विभागामार्फत या कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार आहे. या ट्रेनला महापराक्रमी महादजी शिंदे यांचे नाव दिले जाणार आहे. विरोधकांनी साहीत्य सम्मेलनावर केलेल्या टिकेनंतर राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलन म्हणजे दलाली सुरु आहे, ती राजकीय दलाली आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. कोणालाही कसेही पुरस्कार देतायत, कोणाचे कसेही सत्कार करतायत. यांचा साहित्याशी संबंध काय आहे?असा प्रश्न संमेलन आयोजकांना राऊतांनी विचारलाय तुम्ही दिल्लीत दलाली करायला आला आहात का? साहित्याची काय सेवा करताय, असाही प्रश्न राऊतांनी उपस्थित केला.