'लाडक्या बहिणींना पक्षाच्या कार्यकर्त्या करा'; बावनकुळेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं विरोधकांचा हल्लाबोल

Bawankulen on Ladki Bahin : कोल्हापूरमधील संघटन पर्व कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना केलं आवाहन...

दिक्षा पाटील | Updated: Feb 17, 2025, 07:46 PM IST
'लाडक्या बहिणींना पक्षाच्या कार्यकर्त्या करा'; बावनकुळेंच्या वक्तव्यानं राजकारण तापलं विरोधकांचा हल्लाबोल
(Photo Credit : Social Media)

Bawankulen on Ladki Bahin : राज्यभरात भाजपची सदस्य नोंदणी मोठ्या धडाक्यात सुरू आहे. दीड कोटींच्या सदस्य नोंदणीचं भाजपचं अभियान सुरू आहे. भाजपनं टार्गेट पूर्ण करण्यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांनाही भाजपचे सदस्य करा असं फर्मान चंद्रशेखर बावनकुळेंनी काढले आहेत. कोल्हापूरमधील संघटन पर्व कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना हे आवाहन केलंय.

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे...

चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादान दानवेंनी हल्लाबोल केला आहे. सरकारी योजनेच्या माध्यमातून दबाव आणूण भाजप सदस्य नोंदणी करत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

विरोधकांसोबतच महायुतीच्या नेत्यांनीही यावरून भाजपचे कान टोचले आहेत. योजना सर्वसामान्य बहिणींना प्रोत्साहन देण्यासाठी आहे. योजनेच्या नावाखाली फॉर्म भरून घेणं चूक असल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटल आहे.

राज्यातील लाभार्थ्यांना दिली जाणारी प्रत्येक योजना ही सरकारची योजना असते ना की कोणत्या पक्षाची असते. मात्र, सरकार देत असलेल्या योजनांचा सत्ताधारी पक्षही अनेकदा राजकीय फायदा घेत असतात ही बाब काही आजची नाही. त्यामुळे लाडकी बहीण सारख्या लोकप्रिय योजनेचा फायदा भाजप करून घेताना दिसत असेल तर त्यात काही नवल नाही. 

'मुख्यमंत्री लाडकी बहन योजने' अंतर्गत, 21 ते 65 वर्षे वयोगटातील ज्या महिलांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे  2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे. त्यांना दरमहिन्याला 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा उद्देश राज्यातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांना आर्थिक मदत देणे आहे. महाराष्ट्रात अशा सुमारे 2 कोटी महिलांना राज्य सरकारकडून आर्थिक लाभ मिळत आहेत. तर आमच्या सरकारनं यासाठी एक वेगळं बजेट केल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं. तर काही लोक हे लाडकी बहीण या योजनेला घेऊन चुकीची माहिती देत आहेत अशात त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा या खोट्या बातम्या आहेत, असं त्यांनी म्हटलं होतं.