Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचं आंदोलन संपलेलं नाही... जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा आंदोलनाचं हत्यार उगारलंय. सगेसोय-याच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी 9 फेब्रुवारीची डेडलाईन दिलीय. नाहीतर 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आमरण उपोषण करणार आहेत. त्यातच आता मनोज जरांगे यांनी आमदार, मंत्री यांना टार्गेट केले आहे. मराठा आमदार-मंत्र्यांना मनोज जरांगे यांनी धमकीवजा इशारा दिला आहे.
जे कुणी आमदार, मंत्री मराठा सगेसोयरे आरक्षणासाठीच्या कायद्याला पाठिंबा देणार नाहीत, त्यांची गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिलाय... मराठा नेते दिवंगत शशिकांत पवार यांच्या मुंबईत झालेल्या स्मृतीसभेत ते बोलत होते. एकदा आरक्षण मिळू दे, भुजबळांमध्ये किती दम आहे तेच बघतो, असा दमही जरांगेंनी यावेळी दिला.
15 फेब्रुवारीला अधिवेशन होऊन गेलं तर परत विशेष अधिवेशन बोलावलं जाणार नाही, त्यामुळे 10 फेब्रुवारीपासून उपोषण करण्यावर ठाम असल्याचं मनोज जरांगे-पाटलांनी सांगितलंय..10 तारखेपासून सुरू होणाऱ्या आमरण उपोषणापाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठा बांधवानी उभं राहावं असे आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.
राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगेंनी मागे घेतलं होतं. मात्र सोशल मीडियावरुन जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली.. जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत. आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय. हा कट रचणा-यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय. राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर मराठा आरक्षणाबाबतचं आंदोलन जरांगेंनी मागे घेतलं होतं. मात्र सोशल मीडियावरुन जरांगेंविरोधात जोरदार टीका झाली. जरांगेंची फसवणूक झाल्याची ही टीका होती.. त्यावरुन आता जरांगे चांगलेच संतापले आहेत... आरक्षण मिळालं तरीही गैरसमज पसरवण्याचे काम होत असल्याचा आरोप जरांगेंनी केलाय.. हा कट रचणा-यांची नावं उघड करण्याचा इशारा आता जरांगेंनी दिलाय.