Sharad Pawar | ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात...

ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे.

Updated: Jun 27, 2021, 05:41 PM IST
Sharad Pawar |  ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार? शरद पवार म्हणतात... title=

मुंबई : ठाकरे सरकार 5 वर्षांचा (Thackeray Government) कार्यकाळ पूर्ण करणार का, हा प्रश्न गेल्या काळापासून सातत्याने विचारला जात आहे. याबाबत लोकांमधून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar) यांनी वक्तव्य केलं आहे. ठाकरे सरकार निश्चितच 5 वर्ष पूर्ण करेल, याबाबत मनात अजिबात शंका नाही, असा विश्वास शरद पवारांनी  व्यक्त केला आहे. हे 3 पक्षाचं सरकार अंतर्गत कलहामुळेच पडेल, त्यासाठी आम्हाला काहीही करण्याची गरज नाही, असं भाजपकडून वारंवार पुनरउच्चार केला जात आहे. (Mahavikas Aghadi government will last for 5 years says ncp chief Sharad Pawar)  

विरोधकांकडून वारंवार महाविकास आघाडीवर (Mahavikas Aaghadi) हल्लाबोल केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पवारांनी हे विधान केलं. 3 पक्षांचं सरकार हे चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे. हे सरकार सहजपणे 5 वर्ष पूर्ण करेल, याबाबत माझ्या मनात शंका नाही, असं पवारांनी स्पष्ट केलं.     

पवारांनी या ठाम विश्वासामागील कारणही स्पष्ट केलंय. तिन्ही पक्षांमध्ये समन्वय कायम राखण्यासाठीची जबाबदारी ही सहा नेत्यांकडे देण्यात आली आहे. जेव्हा केव्हा मत-मतांतर होतात, तेव्हा हे 6 जण यावर तोडगा काढतात. पवार बारामतीत (Baramati) बोलत होते. यावेळस त्यांनी याबाबत विधान केलं.

तिन्ही पक्षांची समन्वय यंत्रणा 

"सरकार चालवताना एखाद दुसर्‍या गोष्टीवर मतभेद होणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत यावर तोडगा काढण्यासाठी यंत्रणा असावी, असं निश्चित झालं. यावर समाधान काढण्यासाठी तिन्ही पक्षांमधून प्रत्येकी 2 अशा एकूण 6 जणांवर ही जबाबदारी सोपवण्यात यावी. यानंतर काँग्रेसकडून (Congress) बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण शिवसेनेकडून (Shivsena) एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर एनसीपीकडून (NCP) जयंत पाटील आणि अजित पवार यांना ही जबाबदारी देण्यात आली. अशाप्रकारे 6 नेत्यांचा गट तयार करण्यात आला. त्यानुसार ठाकरे सरकारमध्ये उद्भवणार्‍या मतमतांतरावर हे मंत्री समन्वय साधतात", असं पवार म्हणाले.

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी गेल्या काही दिवसात आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा सूर आळवला. यावरही पवारांनी आपली प्रतिक्रिया दिली. "राजकारणात प्रत्येक पक्षाला आपल्या संघटनेची ताकद वाढविण्याचा अधिकार असतो. त्यात काहीही चूक नाही. पण महाविकास आघाडी सरकार स्थापनेच्या वेळी आम्ही अनेक विषयांवर एकत्र झालो. त्यानंतर आम्ही किमान समान कार्यक्रम (Common Minimum Programme) तयार करण्यात आला. या फॉर्म्युल्यानुसार आम्हाला पुढे वाटचाल करायची आहे" असंही पवारांनी नमूद केलं. 
 
संबंधित बातम्या :

OBC RESERVATION - आरक्षण मिळेपर्यंत निवडणुका नको! लोणावळ्यातील ओबीसी शिबीरात 10 महत्त्वाचे ठराव

OBC RESERVATION प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत येण्याची गरज काय?, जयंत पाटील यांचा फडणवीस यांना सवाल