Maharashtra Weather Update : देशातील वातावरणात सतत बदल दिसून येते आहे. काही दिवसांपूर्वी उन्हाचा तडाखा जाणवत असताना उत्तर भारतात हवामानाने यू टर्न घेतला आहे. बर्फसृष्टी आणि पावसाने हजेरी लावल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तर महाराष्ट्रातही देशातील बदलत्या हवामानाचा परिणाम दिसून येतो आहे. हवामान विभागानुसार (IMD) पुढील पाच दिवसांत देशाच्या अनेक भागांत किमान तापमानात बदल पाहिला मिळणार आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम महाराष्ट्रात पडणार असून विदर्भात ऑरेज अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि अमरावतीमधील शेतकरी चिंतेत आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशारामुळे अवकाळी पावसाचं संकटाने पिकांचं संरक्षण कसं करायचा असा प्रश्न त्यांना सतावतोय. काही जिल्ह्यात गारपीट, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तर विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
निफाड तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांपासून बदललेल्या वातावरणामुळे द्राक्षांवर परिणाम झाला आहे.