पुणे : Maharashtra News : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) एक धक्कादायक बातमी. नोकरीवरून काढले म्हणून ड्रायव्हरने चक्का 22 लाख रुपये किमतीच्या गाड्याच पेटवून दिल्यात. (
नोकरीवरून काढल्याचा राग मनात ठेवून एका ड्रायव्हरने मालकाच्या 22 लाखांच्या गाड्या पेटवून दिल्यात. या विरोधात ड्रायव्हर विनोद भस्के आणि त्याचा भाऊ अंकित भस्के यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी गेल्या तीन वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आरोपी ड्रायव्हरने गाडीचे नुकसान केले होते. त्यामुळे त्याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. तसेच, त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते. याच रागातून त्याने हे कृत्य केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.