लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार

लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत.

Updated: Mar 10, 2019, 06:35 PM IST
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रात ४ टप्प्यात मतदान होणार title=

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलेल्या आहेत. यंदा ७ टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. २०१४ सालच्या लोकसभा निवडणुका या ९ टप्प्यांमध्ये घेण्यात आल्या होत्या. ११ एप्रिल, १८ एप्रिल, २३ एप्रिल, २९ एप्रिल, ६ मे, १२ मे आणि १९ मे या ७ टप्प्यांमध्ये देशभरात निवडणुका होतील. तर २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागतील.

लोकसभा निवडणुकीच्या ७ टप्प्यांपैकी पहिल्या ४ टप्प्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या ४८ जागांसाठीचं मतदान होईल. महाराष्ट्रात ११ एप्रिलला ७ मतदारसंघात, १८ एप्रिलला १० मतदारसंघात, २३ एप्रिलला १४ मतदारसंघात आणि २९ एप्रिलला १७ मतदारसंघात मतदान होईल.

अशा होणार देशभरातल्या निवडणुका

पहिला टप्पा- ११ एप्रिल- ९१ जागा २० राज्य

दुसरा टप्पा- १८ एप्रिल- ९७ जागा १३ राज्य

तिसरा टप्पा- २३ एप्रिल- ११५ जागा १४ राज्य

चौथा टप्पा- २९ एप्रिल- ७१ जागा, ९ राज्य

पाचवा टप्पा- ६ मे- ५१ जागा, ७ राज्य 

सहावा टप्पा- १२ मे- ५९ जागा, ७ राज्य

सातवा टप्पा- १९ मे- ५९, ८ राज्य

एकाच टप्प्यात एवढ्या राज्यात मतदान 

आंध्र, अरुणाचल, गोवा, गुजरात, हरियाणा, हिमाचल, केरळ, मेघालय, मिझोराम, नागालँड, पंजाब, सिक्कीम, तेलंगणा, तामीळनाडू, उत्तराखंड, अंदमान निकोबार, दादरा नगर हवेली, दमण दीव, लक्षद्वीप, दिल्ली, पॉण्डेचेरी, चंडीगड

दोन टप्प्यात या राज्यांमध्ये मतदान

कर्नाटक, मणीपूर, राजस्थान, त्रिपुरा

तीन टप्प्यात या राज्यांमध्ये मतदान

आसाम, छत्तीसगड

चार टप्प्यात या राज्यांमध्ये मतदान

झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उडीसा

जम्मू काश्मीरमध्ये पाच टप्प्यात मतदान 

७ टप्प्यात मतदान होणारी राज्य 

बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल