'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे, मी काहीही बोलू शकतो'

Raj Thackeray Thane Sabha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिका केली. 

Pravin Dabholkar | Updated: May 12, 2024, 09:33 PM IST
'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे, मी काहीही बोलू शकतो'
Raj Thackeray Thane Sabha

Raj Thackeray Thane Sabha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. महायुतीसाठी राज ठाकरेंची कळव्यातील ही तिसरी सभा आहे. 

महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि ठाणे लोकसभेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी आज राज ठाकरे यांनी प्रचारसभा घेतली. यावेळी मनसे आणि शिवसेना हा फेविकॉल का जोड है असं डॉ. श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं. पण पुढच्या वेळेपासून आम्हाला फेविकॉल लावा नाहीतर दरवेळेस आम्हाला बाहेरच्या बाजुने फेविकॉल लावला जातो, असे म्हणत त्यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद मठात गेल्यावर जुने दिवस आठवल्याचे ते म्हणाले. छान टुमदार शहरं उभी राहीली पाहिजेत

वेगवेगळ्या राज्यातून लोक महाराष्ट्रात येतायत. जोपर्यंत बाहेरचे लोंढे थांबणार नाहीत तोपर्यंत कितीही विकास केला तरी थांबणार नाहीत. एका जिल्ह्यात इतक्या महानगर पालिका मग माणसं आली किती. आमच्यावरचा बोझा आवरा हे प्रश्न लोकसभेत मांडा असे आवाहन त्यांनी श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्केंना केले. इथे अनेक वर्षांपासून राहणारे महाराष्ट्रातील आहेत. अट फक्त एक मराठी आलं पाहिजे.

या लोकसभेच्या निवडणुकीला विषयच नाहीत, असे राज ठाकरे म्हणाले. 

वडील चोरले या विषयावर निवडणूक सुरु आहे. फोडाफोडीचे राजकारण मला मान्य नाही. एकमेकांकडे बघा. या मनसेचे नगरसेवक तुम्ही खोके खोके देऊन तुम्ही फोडले. मागितले असते तर दिले असते. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली. 

माझा बाहेरुन पाठींबा आहे. मी काहीही बोलू शकतो. आपल्याला अजून फेविकॉल थोडी लागलाय असे म्हणत त्यांनी श्रीकांत शिंदे यांनाही टोला लगावला. 

यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ दाखवला. ज्यामध्ये त्यांनी बाळासाहेबांवर टीका केली होती. अशा व्यक्तीला तुम्ही नेते पद देता? असा प्रश्न त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

शिवसेना सोडली तेव्हा बाळासाहेबांना भेटलो. कितीही संकटे आली तरी दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करणार नाही, असे ते म्हणाले. 

आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं नरेंद्र मोदी, अमित शाह भर सभेत म्हणाले. त्यावेळी तुम्ही का आक्षेप घेतला नाही. लाखो लोकांची मते वाया घालवलीत. आणि ज्यांच्या विरोधात मते मागितली त्यांच्यासोबत गेलात.

हल्ली कोण कोणासोबत आहेत हेत कळत नाही, असे ते म्हणाले. 

या देशात लाखोने चांगले मुसलमान राहतात. त्यांना दंगे नको असतात. पण त्यात मुठभर वाह्यात औलादीपण आहेत. पुण्यात फतवे काढले गेले. मी कॉंग्रेस, ठाकरे गटाला मत देणार असे फतवे निघाले. कारण गेल्या 10 वर्षात डोकं वर काढायला मिळाले नाही. यासाठी त्यांचे पाठींबे सुरु आहे. या देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.

येणाऱ्या 20 मे रोजी श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांना निवडून द्या. आज जे मी काही सांगितलं. त्याचा पुढचा भाग मी त्यांच्यासोबत बोलेन असे ते म्हणाले.