Loksabha Election: लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे. आज 17 एप्रिल रोजी प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. नेते सध्या प्रचारात व्यस्त आहेत. अजित पवार यांनीही लोकसभेसाठी कंबर कसली आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची इंदापूरात डॉक्टरांशी बैठक पार पडली. त्यावेळी त्यांनी एक मिश्किल टिप्पणी केली आहे. पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो, असं त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
इंदापुरात अजित पवार यांची डॉक्टरांसोबत एक बैठक पार पडली. या बैठकीत डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, ल काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, सरकारी यंत्रणेकडून निश्चित तुम्हाला त्रास होत असेल काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला मानसिक त्रास दिला जात असेल. परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात हजार मुलांच्या पाठीमागे 850 मुलींचा जन्मदर हे पाहता पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय असा प्रश्न पडतो, असी मिश्लिक टिप्पणी अजित पवार यांनी केली आहे. तसंच, आपण केलेल्या मागण्यांचा शासन दरबारी विचार केला जाईल, असे आश्वासनही अजित पवारांनी डॉक्टरांना दिले आहे.
इंदापुरात डॉक्टरांसोबत संवाद साधताना अजित पवारांनी त्यांना हसत हसत एक सल्ला दिला आहे. तुमच्याकडे अनेक रुग्ण येतात आणि रुग्ण हा डॉक्टरांशीच खरे बोलतो. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावरती योग्य उपचार करता. हे करत असताना जरा आमचं विचारा, चाचपणी करा. जर त्यांनी आमचं नाव सांगितलं तर चांगली वागणूक द्या आणि दुसर नाव घेतलं की असं इंजेक्शन टोचा, असा मिश्किल टोला त्यांनी लगावला आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यावर एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी सावरुन घेत सॉरी माफ करा असे म्हणायला विसरले नाहीत.
दरम्यान, अजित पवार यांनी अलीकडेच केलेले एक वक्तव्य चर्चेत आले आहे. आपल्या भागाला निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र तुम्ही मतदान करायला गेल्यावर मशीनमध्ये देखील आपल्या उमेदवाराच्या समोरचं बटन कचाकचा दाबा. म्हणजे मला बी निधी द्यायला बरं वाटेल.. नाहीतर माझा पण हात आकडता येईल, असं वादग्रस्त विधान अजित पवारांनी केले आहे.