औरंगाबाद : राज्यात भाजप-शिवसेनेची युती तर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली होती. याचबरोबर प्रकाश आंबेडकर यांचा भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. या निवडणुकीत औरंगाबादमधून शिवसेनेनं चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिली होते. चंद्रकांत खैरे यांच्यासमोर काँग्रेसच्या सुभाष झांबड यांचं आव्हान होतं. तर एमआयएमने आमदार इम्तियाज जलील हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते.
- औरंगाबादमधील रंगतदार लढतीत इम्तियाज जलील यांचा विजय झाला आहे.
६ वाजता - औरंगाबादमधील निवडणूक रंगतदार ठरत आहे, अखेरच्या २ फेऱ्यांआधी २,२२० मतांनी चंद्रकांत खैरे आघाडीवर आहे. अतिशय अतितटीची अशी लढाई येथे पाहायला मिळत आहे.
1 वाजता - शिवेसेनेचे चंद्रकांत खैरे आघाडीवर
२०१४ साली या मतदारसंघातून चंद्रकांत खैरे विजयी झाले होते. चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा १,६२,००० मतांनी पराभव केला होता.