सांगली : सांगलीमध्ये भाजप उमेदवार संजय पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता. अखेर या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वाभीमानी पक्षाच्या विशाल प्रकाशप्रभू पाटील यांच्यासोबत त्यांची खरी लढत होती. संजय पाटील यांच्याविरोधात सांगलीमध्ये विरोधकांकडे सक्षम उमेदवार नव्हता. मतदारसंघातील अनेक कामांसाठी संजय पाटील यांनी निधी आणल्याने लोकांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक प्रतिसाद होता. राजू शेट्टी यांनी हा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्याची मागणी केल्यानंतर काँग्रेसने त्यांना ही जागा दिली. त्यानंतर स्वाभिमानीने विशाल पाटील यांना येथून उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. वंचित बहुजन आघाडीने येथे जयसिंग शेंडगे यांना उमेदवारी दिली होती.
दु.1.00- दुपारी 1 पर्यंत संजयकाका पाटील 56 हजार 450 मतांनी आघाडीवर
12.00-दुपारी 12 पर्यंत संजयकाका पाटील 39481 मतांनी आघाडीवर
9.44 मि- संजयकाका पाटील 2033 मतांनी आघाडीवर
उमेदवार |
पक्ष |
मतदान |
संजयकाका पाटील | भाजप | 611563 |
प्रतिक पाटील | काँग्रेस | 372271 |
नानासो बंडगर | बसपा | 11378 |
नितीन सावगवे | बहुजन मुक्ती पक्ष | 8405 |
सुरेश माने | अपक्ष | 8353 |
संजयकाका पाटील यांचा २ लाख ३९ हजार २९२ मतांनी विजय झाला होता. काँग्रेसच्या प्रतिक पाटील यांचा त्यांनी पराभव केला होता.