Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

Maharashtra Breaking News LIVE 19 February 2025 in Marathi:<Summery>महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. महाराष्ट्रातील ताज्या बातम्या. वाचा राजकारण, मनोरंजन, कला, क्रीडा, व्यवसाय, गुन्हेगारी वृत्त, या आणि अशा विविध क्षेत्रातील तसेच, मुंबई-महाराष्ट्रासहीत देश-विदेशातल्या ताज्या घडामोडी. बातम्यांचे वेगवान LIVE अपडे्स फक्त झी २४ तास वर...   

Feb 19, 2025, 17:59 PM IST
Maharashtra Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज एका क्लिकवर

19 Feb 2025, 10:44 वाजता

कॅन्सरवरची लस अंतिम टप्प्यात

 

Cancer Vaccine : कर्करोगावरची लस अंतिम टप्प्यात असून त्याची मानवी चाचणी सुरू झालीय. येत्या सात-आठ महिन्यांत हे काम पूर्ण झाल्यानंतर ती सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल, असा दावा ‘आयुष’ मंत्रालयाचा स्वतंत्र कारभार पाहणारे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केला. कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी जिल्हा रुग्णालयात एक विशेष कक्ष उभारण्यात येणारेय. याचबरोबर आता कर्करोग होऊ नये म्हणून लस विकसित केली जाते. ही लस लवकर उपलब्ध होऊ शकेल अशी माहिती प्रतापराव जाधवांनी दिलीय. 

19 Feb 2025, 10:08 वाजता

भारतीय पोस्ट विभागात मेगाभरती, विविध पदांच्या 21 हजार पदांची भरती

 

Indian Post Department Recruitment : बेरोजगार तरुणांसाठी आनंदाची बातमी.. जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधता असाल तर भारतीय पोस्ट विभागात तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे.. कारण पोस्टात तब्बल 21 हजार पदांची मेगाभरती आहे.. पात्र उमेदार अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज भरू शकतात. 3 मार्चपर्यंत उमेदवारांना यासाठी अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर उमेदवारांना 6 मार्च ते 8 मार्च 2025 या कालावधीत अर्जामध्ये सुधारणा करण्याची संधी दिली जाईल.

 

19 Feb 2025, 09:21 वाजता

सिडकोच्या घरांची आज सोडत

 

Cidco : i'माझे पसंतीचे सिडको घर' योजनेतील २६ हजार घरांसाठी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते संगणकीय सोडत होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने या मुहूर्तावर गृहस्वप्नांची पूर्तता होईल, असा अशावाद व्यक्त होतोय. सिडकोच्या २६ हजार घरांसाठी २१ हजार ३९९ अर्जदारांनीच अर्ज शुल्कासह अनामत रक्कम भरलीय.दुपारी १ वाजता ही सोडत होणार आहे. 

19 Feb 2025, 08:36 वाजता

कमाल खान पुन्हा बरळला

 

Kamal Khan : विकिपीडियावरील संभाजी महाराजाबाबतचा आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खाननं शेयर केलाय. विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह असून सुद्धा तोच मजकूर खरा असल्याचं सांगत कमाल खानने तो शेअर केलाय. विकीपीडियावरील शंभूराजेंबाबतचा मजकूर आक्षेपार्ह असल्याची बातमी झी 24 तासनं लावून. त्यानंतर सरकारनं विकिपिडीयावरून बदनामीकारक मजकूर काढण्याचे आदेश दिलेत. . तर दुसरीकडे कमाल खान तोच मजकूर खरा असल्याचं सांगत ट्विट केलाय.. त्यानं विकिपीडियावरील माहितीची सत्यता न तपासता माहिती ट्विट केलीय.. त्यामुळे कमाल खानवर सरकार कारवाई करणार का याकडे लक्ष...

19 Feb 2025, 08:05 वाजता

अमरावतीमध्ये आढळला GBSचा रुग्ण

 

Amravati GBS : अमरावतीमध्ये GBSचा रुग्ण आढळून आलाय.. पुण्याहून अमरावतीत दाखल झालेला रुग्णाला GBSची लागण झालीये.. या रुग्णावर जिल्हा समान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असून त्याला ICUमध्ये दाखल करण्यात आलंय. बारा दिवसांपूर्वी हा रुग्ण पुण्याहून अमरावतीमध्ये आला होता. दरम्यान अमरावतीमध्ये आणखी एक रुग्ण संशयित असल्याची माहिती समोर आलीये... जीबीएस रुग्ण आढळल्याने अमरावतीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागानंही खबरादी घेण्याचं आवाहन केलंय. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 07:41 वाजता

रेल्वे स्टेशनवर थुंकल्यास 500 रुपये दंड, क्लीन अप मार्शलच्या धर्तीवर कारवाई

 

Railway Station : रेल्वे स्टेशनच्या परिसरात थुंकणा-या बेशिस्त प्रवाशांना आता दंड भरावा लागणार आहे.. या प्रवाशांकडून 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.. स्टेशन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पश्चिम रेल्वे प्रशासनाने कठोर पाऊल उचललंय.. मुंबई महापालिकेच्या क्लीन अप मार्शलच्या धर्तीवर रेल्वे स्टेशनच्या परिसरात 'डेप्युटी स्टेशन सुपरवायझर कमर्शियल'ची नियुक्ती करण्यात येणार आहे.. आतापर्यंत अशा प्रकरणांत 100 ते 200 रुपयांचा दंड आकारला जात होता. मात्र प्रवासी त्याकडे दुर्लक्ष करत असल्यां दंडाची रक्कम वाढवण्यता आलीये.. 

बातमीचा व्हिडीओ पाहा-

 

19 Feb 2025, 07:39 वाजता

किल्ले शिवनेरीवर आज शिवजन्मोत्सव सोहळा

 

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी असलेल्या किल्ले शिवनेरीवर आज 395वी शिवजयंती साजरी होत आहे.. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित सकाळी 8 वाजता किल्ले शिवनेरीवर शासकीय शिवजयंती जन्मोत्सव सोहळा संपन्न होणार आहे... दरम्यान पुण्याच्या जिल्हाधिका-यांच्या हस्ते शिवाई देवीची महापूजा संपन्न झाली असून पालखी शिव जन्मस्थळाकडे प्रस्थान करणार आहे....शिवजयंतीनिमित्त देशाच्या कानाकोप-यातून लाखो शिवभक्त किल्ले शिवनेरीवर महाराजांच्या जन्मस्थळाकडे नतमस्तक होण्यासाठी दाखल होत आहेत.

बातमीचा व्हिडीओ पाहा-