कोल्हापूर : गेल्या २० वर्षांपासून कोल्हापूरच्या देवीला बालाजीकडून येणारा शालू नेसवण्याची परंपरा यंदापासून बंद करण्यात आली आहे. करवीर निवासिनी ही अंबाबाई आहे की महालक्ष्मी, हा वाद गेल्या काही वर्षांपासून रंगत आहे.
नवरात्रात कोल्हापूरच्या देवीसाठी तिरूपती बालाजी मंदीरातून मानाचा शालू येत होता. मात्र, कोल्हापूरची देवी ही अंबाबाई नसून महालक्ष्मी आहे, असं पुजाऱ्यानं म्हटल्याचा दावा भक्तांनी केला आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे.
यापूर्वी तिरुपती देवस्थानाला पत्र लिहून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती नवरात्रौत्सवात शालू पाठवण्याची मागणी करत होतं. यावेळी मात्र देवस्थान समितीने तिरुपती देवस्थानाशी कोणताही पत्रव्यवहार केला नाही.