तुषार तापसे, झी मीडिया, सातारा - आजचा क्रिकेट सामना इंडिया आणि बांगलादेशमध्ये होता. आज रंगलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा पराभव केलाय. हा सामना पाहताना लोकांमध्ये उत्साह होता. हाच उत्साह साताऱ्यात एका कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये दिसला. या कर्मचाऱ्यांनी वेगळ्याच पद्धतीने ती मॅच पाहताना पार्टी केली ती ही चक्क कार्यालयात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. (India Bangladesh match and biryani tandoori party at government office nz)
साताऱ्यातील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात भारत बांगलादेश मॅच दरम्यान बिर्याणी आणि तंदूर पार्टी रंगल्याचे पहायला मिळाले. या कार्यालयातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी चक्क तंदूर आणि बिर्याणीच्या मेजवानीवर ताव मारताना निदर्शनास आले. काम बाजूला सारुन हे कर्मचारी चक्क कार्यालयातील कामकाजाच्या टेबलावर एकत्रितपणे बिर्याणी आणि तंदूर वर ताव मारताना या व्हिडिओत दिसत आहेत. भारत-बांगलादेश क्रिकेटचा सामना पाहण्यात ते इतके मग्न झाले की त्यांनी कामासाठी आलेले अनेक नागरिकांना ताटकळत ठेवले.
या घटनेने तेथे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त करत या सर्व गोष्टींचे चित्रीकरण केले आहे. ही बाब गंभीर असून या संबंधित कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाईची मागणी लोकांकडून होते आहे.
क्रिकेटचा हा सामना आपण हारता हारता जिंकलो आहोत. पावसाचा व्यत्यत आल्यामुळे टीम इंडियाचा पराभव निश्चित मानला जात होता. मात्र पाऊस थांबल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी कमाल करत सामना फिरवला. या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 5 रन्सने पराभव केला. टीम इंडियाचा हा वर्ल्डकपच्या स्पर्धेतील तिसरा विजय होता.