चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर शेकडो पक्षांची शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
भामडेळी गावाजवळील पीक काढलेल्या शेताच्या कुंपणावर अज्ञात व्यक्तींनी फिशनेट अर्थात मासे पकडण्याचं जाळं लावून ही शिकार केलीये. पक्षीप्रेमींच्या सतर्कतेमुळे ही घटना उघडकीस आली आहे. या जाळ्यांमध्ये अडकून कवडा, रातवा, कोतवाल, बगळा, मैना यांसारखे अनेक पक्षी अडकून मरण पावले आहेत.
यासंदर्भात वनविभागाकडे तक्रार केली असून वनविभागानं यासंदर्भात चौकशी सुरु केलीये.