.... म्हणून भर उन्हात शिवसैनिकाचे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दंडवत

सत्तास्थापनेवरून भाजपा-शिवसेनेचे संबंध ताणलेल्या अवस्थेत आहेत

Updated: Nov 3, 2019, 03:17 PM IST
.... म्हणून भर उन्हात शिवसैनिकाचे दोन किलोमीटर अंतरापर्यंत दंडवत title=

रवींद्र कांबळे, झी मीडिया, सांगली : शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून एक कट्टर शिवसैनिक हरिदास पडळकर यांनी २ किलोमीटर दंडवत घातले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून पडळकर यांनी गणपती बाप्पाला  साकडे घातले आहे. भर उन्हात रस्त्यावर झोपून दोन किलो मीटर हे  दंडवत घातले आहे. सांगलीच्या शिवाजी पुतळा पासून ते गणपती मंदिरा पर्यंत  दंडवत घातले आहे.

काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला तालुक्यामधील एका निष्ठावंत शिवसैनिकानं शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल तेव्हाच पायाच चपला घालीन, असा निर्धार त्यानं केला. शंकर मेटकरी असं या शिवसैनिकांचं नाव आहे. 

शंकर सोलापुरातल्या महूद गावचा रहिवासी आहे. घरची परिस्थिती बेताची असलेला शंकर मेटकरी गेल्या वीस - पंचवीस वर्षांपासून शिवसेनेत काम करतोय. सध्या मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेनेतले संबंध ताणलेले आहेत. 

अशा परिस्थितीत १९९५ नंतर आता पुन्हा एकदा शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल, अशी आशा शंकरला आहे. त्यामुळे तब्बल २४ वर्षांनंतर खरंच शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपद येणार का? आणि शंकरचा निर्धार पूर्ण होणार का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.