Pune Rains : सोमवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं पुणेकरांची रात्रीची झोप उडवली. मंदिरं, रस्ते, गल्लीबोळ सर्वकाही जलमय झाल्यामुळं पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालं. (Heavy rain splashed Pune major areas) सोशल मीडियावर व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर अरेच्छा! पुण्याचे रस्ते पाण्यात वाहून गेले की काय? असाच प्रश्न अनेकांना पडला. तिथे पुण्याला पावसानं झोडपलेलं असतानाच इथे सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला.
मुसळधार पावसानं Memers च्या कलात्मकतेला चालना दिली आणि पोट धरुन हसायला भाग पाडणारे मीम्स तुफान व्हायरल झाले. कुठे 'हेराफेरी'मधल्या (Hera Pheri) 'बाबूराव'चा संदर्भ पाहायला मिळाला, तर कुठे पंकज त्रिपाठीच्या डायलॉगनं पुणेकरांची परिस्थिती सांगितली गेली.
किमान शब्दांत पुण्यातील परिस्थितीचं कमाल वर्णन या मीम्समधून पाहायला मिळलं. सध्या याच मीम्समुळं नेटकऱ्यांना हसू अनावर झालं आहे. पण, विनोदाचा भाग बाजूला ठेलल्यास, पुण्यात झालेला पाऊस नागरिकांची चिंता वाढवणारा होता असंच म्हणावं लागेल.
#punerains
Tomorrow office? pic.twitter.com/g2CgcmCwrP— Vaibhav (@vrushv14) October 17, 2022
After a break of one day.
पुणेकर to the Rain:
#pune #punerains #punerain pic.twitter.com/H6Pi2M1Pmn— Trupti More (@TruptiMore9) October 17, 2022
Mpsc aspirants today...#punerains #mpsc #राज्यसेवा2022जागावाढ pic.twitter.com/eYyVrBg8CE
— कायरा (@Kiara_00012) October 17, 2022
Me to #PuneRains pic.twitter.com/QJKolSbigE
— Baandya (@Bahut_Scope_Hai) October 14, 2022
Punekars right now#punerains pic.twitter.com/phkVeSiwV3
— Elon Jeff Zuckerberg (@ElonMus26728208) October 17, 2022
Right now #Punekar #punerains #Pune pic.twitter.com/IKgmIx6N05
— Shailendra Tripathi (@KonnectoShail) October 18, 2022
पावसामुळं पुणे रेल्वे स्थानकात पावसाचं पाणी शिरल्यांना प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तिकीट घरात पाणी शिरलं होतं. त्यामुळे या तिकीट घराला तलावाचं स्वरुप दिसून आलं.
ऐतिहासिक शनिवार वाडा (shaniwar wada) यात दूर नव्हता. पुणे शहराच्या मध्यावर असलेल्या शनिवार वाडा, लाल महाल (Laal mahal), कसबा पेठ (Kasba peth) परिसरात रात्री पाणीच पाणी झालं. कसबा पेठेतल्या घरांमध्येही पाणी शिरलं. तिथे श्रीमंत भाऊ रंगारी गणपती ट्रस्टच्या संग्रहालयाला देखील पावसाचा फटका बसला. संग्रहालयातील खुर्च्या तसंच इतर साहित्य पाण्याखाली गेलं होतं.