Deputy CM Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस आहे. राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. दरम्यान ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांचे तोंडभरुन कौतुक केलंय. मागच्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात लाडकी बहीण योजना राज्यभरात सुरु झाली. ही योजना खूपच लोकप्रिय ठरली. यानंतर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आले. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली.
तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार..हे गाणे गात आशा भोसले यांनी एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. 'मी तुमच्यासाठी गातेय...तुमचा वाढदिवस आहे. तुम्ही मला फार आवडता. तुम्ही अचानक वर आलात. आम्हाला माहित नव्हतं तुम्ही काम करता. ज्याप्रमाणे बाळासाहेबांनी शिवसेना घडवली तशी तुम्ही परत अभिमान वाटतो. ज्यावेळी सर्वच निवळलं होते. सर्व तुमच्यावर धावून आले होते. तुम्ही सर्वांना उत्तर दिलंत. तुम्ही यशस्वी झालात आणि आणखी यशस्वी व्हाल. मी तुमच्यापेक्षा मोठी आहे, तुम्हाला आशीर्वाद देतेय. तुम्ही ऐकत असाल भाषण किंवा नसाल ऐकत. असेच काम करत राहा. चांगले काम केल्याने कोणीही कधी संपत नाही.', असेही त्यापुढे म्हणाल्या.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे येथील शुभ-दीप निवासस्थानी पत्नी लता आणि सून वृषाली यांनी त्यांचे औक्षण करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर कुटूंबियांच्या साथीने केक कापून त्यांनी वाढदिवस साजरा केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एकनाथ शिंदेंना शुभेच्छा दिल्या.
आपकी प्रेरक शुभकामनाओं के लिए धन्यवाद माननीय गृहमंत्री अमित भाई। आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी एवं आपके कुशल नेतृत्व में महाराष्ट्र की जनसेवा एवं विकास के लिए मुझे निरंतर ऊर्जा प्राप्त होती है। आपके स्नेह और शुभकामनाओं के लिए एक बार फिर से तहे दिल से शुक्रिया... https://t.co/Y0mLNywbeF
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 9, 2025
वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी कॉमन मॅनला उद्देशून एक पोस्ट लिहिली आहे. कॉमन मॅन का हाथ एकनाथ शिंदें के साथ...मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी 'सीएम' म्हणजे 'मुख्यमंत्री' नसून #कॉमन_मॅन आहे तर उपमुख्यमंत्री म्हणजे डिसीएम झाल्यावर मी डीसीएम म्हणजे मी 'डेडीकेटेड टू कॉमन मॅन' आहे असं सांगू लागलो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदाने मला ही अनोखी भेट देऊ केली.
कॉमन मॅन का हाथ एकनाथ शिंदें के साथ...
मुख्यमंत्री असताना मी नेहमी म्हणायचो की मी 'सीएम' म्हणजे 'मुख्यमंत्री' नसून #कॉमन_मॅन आहे तर उपमुख्यमंत्री म्हणजे डिसीएम झाल्यावर मी डीसीएम म्हणजे मी 'डेडीकेटेड टू कॉमन मॅन' आहे असं सांगू लागलो.
आज माझ्या वाढदिवसानिमित्त एका सहृदाने मला ही… pic.twitter.com/bsghnWq1xg
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 9, 2025
ख्यातनाम व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांच्या कुंचल्यातून जन्म घेतलेल्या 'कॉमन मॅन'ने मोठ्या विश्वासाने माझ्या खांद्यावर हात टाकला आहे अशी ही प्रतिमा आहे. कॉमन मॅनने माझ्या खांद्यावर विश्वासाने टाकलेला हात, हीच माझी त्याच्यासाठी सदैव कार्यरत राहण्यामागची प्रेरणा असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.