मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. गेल्या 24 तासांत 46 हजार 781 नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 816 रूग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 58 हजार 805 रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात उपचार घेणाऱ्या रूग्णांची संख्या 5 लाख 46 हजार 129 इतकी आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 78 हजार 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
Maharashtra reports 46,781 new #COVID19 cases, 58,805 discharges and 816 deaths in the last 24 hours
Active cases: 5,46,129
Total cases: 52,26,710
Death toll: 78,007
Total recoveries: 46,00,196 pic.twitter.com/JTMOvpDRpN— ANI (@ANI) May 12, 2021
मुंबईत गेल्या 24 तासात 2 हजार 116 रुग्णांची वाढ झाली आहे. तर 4 हजार 293 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत मुंबईत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत अजून एकूण 38 हजार 859 सक्रिय रुग्ण आहेत.
Maharashtra: Mumbai records 2116 new #COVID19 cases, 66 fatalities and 4293 recoveries in the past 24 hours
Total cases: 6,82,102
Total recovered cases: 6,27,373
Death toll: 14,008Active cases: 38,859 pic.twitter.com/bSHz1vg1Hn
— ANI (@ANI) May 12, 2021
कल्याण डोंबिवली क्षेत्रात 24 तासात सर्वाधिक 19 कोरोना रुग्णांचे मृत्यू झाला असून 528 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका दिवसात 724 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. उपचार घेत असलेल्या रूग्णांची संख्या 5 हजार 711 एवढी आहे.
जळगाव जिल्ह्यात आज 849 नव्या कोरोना रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 लाख 32 हजार 423 झाली आहे. आज 847 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात आज 11 कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.