काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक

अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.

Updated: Jul 11, 2017, 12:34 PM IST
काँग्रेस आमदार नितेश राणेंना अटक title=

सिंधुदुर्ग : अवैध पर्ससीन विरोधी आंदोलन करताना काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी सहाय्यक मत्स आयुक्तांना मासा फेकून मारल्या प्रकणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नितेश राणे यांना आज मालवण पोलिसांनी अटक केली.

अवैध पर्ससीन विरोधी आंदोलनातील आमदार नितेश राणेंसह २६ संशयीत मालवण पोलीस स्थानकात दाखल होते. यावेळी त्यांना अटक करण्यात आली. संशयीताना कुडाळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने अवैध पर्ससीन विरोधात मालवण येथील सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयात मासे फेकल्या प्रकरणी आमदार नितेश राणेंसह सुमारे शंभर जणांवर मालवण पोलीस स्थानकात  गुन्हे दाखल करण्यात आला होता. यातील पाच संशयितांची शनिवारी कुडाळ न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती.