CM In Davos Exclusive: लोकांच्या विरोधामुळे देशाच्या व्हिजनचे नुकसान, कोकणातील मेगा प्रोजेक्टबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री?

CM Devendra Fadnavis:  मुंबईच्याजवळ आम्ही इनोव्हेशन सिटी तयार करतोय. जी एआय प्रेरित असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

Pravin Dabholkar | Updated: Jan 23, 2025, 06:03 PM IST
CM In Davos Exclusive: लोकांच्या विरोधामुळे देशाच्या व्हिजनचे नुकसान, कोकणातील मेगा प्रोजेक्टबद्दल काय म्हणाले मुख्यमंत्री? title=
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

CM Devendra Fadnavis on konkan mega project: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या दावोस दौऱ्यावर आहेत. दावोस दौऱ्यावर महाराष्ट्राने 16 लाख कोटीहून अधिकचे करार केले. दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने 20 ते 24 जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक आणण्याच्या हेतूने फडणवीसांचा हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जात आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोस येथून 'झी न्यूज'ला विशेष मुलाखत दिली. यात त्यांनी एआय, महाराष्ट्रातील रोजगार, विविध प्रकल्प यावर भाष्य केले. 

महाराष्ट्रात 65 टक्के एमओयू ट्रान्सलेट होतात. आम्ही 80 टक्के एमओयू ट्रान्सलेट केले. पण आता प्रत्येक एमओयू ट्रान्सलेट होईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही गुगलसोबत काम करतोय. गुन्हे कमी करण्यासाठी एआयची मदत घेतोय. प्रत्येक सेक्टरमध्ये करार आहे. आमच्यासोबत करार केलेल्या कंपनी जागतिक आहेत. नोकऱ्यांचे मार्केट बदलतंय, यासाठी आम्ही तरुणांना तयार करत असल्याचे फडणवीस म्हणाले.. 

आर्टिफिशिल इंटेलिजन्स आपण थांबवू शकत नाही. ते आपल्या जिवनात येणार आहे. आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. एआय शैक्षणिक अभ्यासक्रमात आहे. मुंबईच्याजवळ आम्ही इनोव्हेशन सिटी तयार करतोय. जी एआय प्रेरित असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

ईव्ही, ग्रीन एनर्जीमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक काम करतोय. 2030 मध्ये 50 टक्क्याहून अधिक रिन्यूएबल एनर्जीचा वापर करु,असे फडणवीस म्हणाले. सार्वजनिक वाहतूकीला आम्ही ग्रीन करतोय. ईव्ही बसेसचा वापर वाढवत असल्याचे ते म्हणाले.  

यावेळी कोकणातील प्रकल्पाबद्दल त्यांना विचारण्यात आले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मला असं वाटतं आमची सर्वात मोठी चूक झालीय की आमच्याकडे लोकांनी विरोध करुन देश आणि आमच्या व्हिझनचे नुकसान केलंय. पण आम्ही त्याला रुळावर आणलय. एक अतिम फिजिबिलिटीचा रिपोर्ट यायचा बाकी आहे. तो आला की कामाला वेगाने सुरुवात होईल. कोकण मेगा रिफायनरी सेमी कंडक्टर संदर्भात विविध कंपन्यांसोबत करार झाले असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.  

मुंबई, पुण्याजवळ इंडस्ट्री डेव्हलपमेंट वेगाने होतोय. पण विदर्भाचं काय असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर बोलताना, 'मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात चांगला विकास होतोय. गडचिरोली जी नक्षलवाद्यांसाठी ओळखली जायची ते आता स्टील शहर म्हणून ओळखलं जाईल.', असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. मुंबईत बीकेसीमध्ये खूप चांगला विकास होतोय. इथे भूमीअंतर्गत मेट्रोचे काम सुरु आहे. इथून देशात कुठेही जाऊ शकता, असेही ते म्हणाले.