उमेश परब, झी मीडिया, सिंधुदूर्ग: राज्यात जूनमध्ये मोठं सत्तातर (Maharashtra Politics) झालं. शिंदे गट आणि ठाकरे गट (Shinde vs Thackeray) यांच्या सध्या एक वेगळीच झुंज पाहायला मिळत आहे. त्यातून सध्या सगळीकडेच वातावरण आहे कॉर्टाच्या सुनावणीचं. याच पार्श्वभुमीवर राज्यात शिंदे फडवणीस सरकार (Shinde - Phadanvis Sarkar) आल्यानंतर कणकवली नगरपंचायतला दिवाळी बंपर निधी मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून रस्ते विकासासाठी विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत 5 कोटी तर नागरी सुविधासाठी नागरी सुविधा योजनेअंतर्गत 5 कोटी व अन्य विकास योजनांतून 13.30 कोटी मिळून एकूण 23.30 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. (chief minister eknath shinde donates 23 crore and 30 lakhs diwali bumber fund)
केवळ आमदार नितेश राणेंच्या (Nitesh Rane) माध्यमातून हा दिवाळी बंपर निधी प्राप्त होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली तसेच कणकवली नगरपंचायतला स्टाप पॅटर्न मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभिजीत मुसळे, माजी नगरसेवक किशोर राणे, महेश सावंत, राजू गवाणकर आदीसह पदाधिकारी उपस्थित होते. कणकवली नगरपंचायतच्या विकासासाठी 26 ऑक्टोंबरला आमदार नितेश राणे यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे यांना फोन आला. ते दिवाळी निमित्त सुट्टीवर असल्याने 27 ऑक्टोंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचे ठरले.
नगराध्यक्ष बाहेर असल्याने त्यांच्या वतीने मी गेलो. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी निधिबद्दल यशस्वी चर्चा केल्यावर कणकवली नगरपंचायत (Kankavali Nagarpanchayat) रस्ते विकासासाठी विशेष रस्ता अनुदान या योजनेअंतर्गत 5 कोटी, नागरी सुविधेसाठी 5 कोटी निधी देण्याचे आदेश सचिवांना देण्यात आले. कणकवली नगरपंचायतला स्टाप पॅटर्न मंजूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
मुख्यमंत्री यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्यासाठी आदेश देण्यात आले आहे, असे बंडू हर्णे यांनी सांगितले. गेली पाच वर्षे प्रलंबित कामे राहिली ती कामे केली जातील. अनेक प्रभागातील तातडीने कामे मार्गी लावली जाणार आहेत. राज्याचे पर्यावरण मंत्री मंगल प्रभात लोढा (Lodha) यांच्या सोबत नितेश राणे यांचेसमवेत आमची भेट झाली. त्या भेटीत आरक्षण 27, 28 मध्ये कॅफे हाऊस, स्पोर्ट शूज व अन्य कामे प्रलंबित होती.
गेल्या 4 वर्षे पाठपुरावा आम्ही करत होतो, स्थानिक पुढाऱ्यांच्या विरोधामुळे होत नव्हती. या कामासाठी काही दिवसांतच निधी देण्याचा शब्द दिला आहे. पर्यटन विकास निधीतून आरक्षण 27, 28 या विकासासाठी दुसरा टप्पा 10 कोटी, इतर कामांसाठी 2.5 कोटी तर गार्डन साठी 80 लाख जिल्हा नियोजन मधून मंजूर होणार आहे .नगरपंचायतला आमदार नितेश राणेंची माध्यमातून दिवाळी बंपर 23.30 कोटींचा निधी प्राप्त होणार आहे, असेही बंडू हर्णे यांनी सांगितले. हा निधी पहिल्याच बैठकीत देण्याचे मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार नितेश राणे या सर्वांचे आभार मानत असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले.