नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, वडिलांसोबत फिरत असतानाच चारचाकी आली अन्...

Chhatrapati Sambhaji Nagar News: शहरातील नामांकित बिल्डरच्या  7 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आले

विशाल करोळे | Updated: Feb 5, 2025, 08:09 AM IST
नामांकित बिल्डरच्या मुलाचे अपहरण, वडिलांसोबत फिरत असतानाच चारचाकी आली अन्...  title=
chhatrapati sambhaji nagar news Builders 7 year old Son Kidnapping

Chhatrapati Sambhaji Nagar News:  छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील नामांकित बिल्डरच्या 7 वर्षीय मुलाचे खंडणीसाठी मंगळवारी रात्री अपहरण करण्यात आल्याचे समोर आलं आहे. घरापासून अवघ्या 100 मीटर अंतरावरील सेंट्रल मॉल येथून अपहरण झाले होते. 

मिळालेल्या माहितीनुसार, वडील आणि मुलगा दोघंही एकत्र घराबाहेर पडले होते. फिरण्यासाठी दोघंही घराबाहेर पडले होते. वडील पुढे चालत असतानाच मुलगा सायकलवर मागून येत होता. त्यानंतर अचानक एक काळ्या रंगाची चारचाकी आली आणि मुलाला वडिलांच्या डोळ्यांदेखत उचलून नेले. मंगळवारी रात्री 9च्या सुमारास सिडको एन-4 मध्ये ही घटना घडली आहे. 

चैतन्य सुनील तुपे असं अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. चारचाकीतून तिघे जण उतरले अन् मुलाला सायकलवरून उचलून गाडीत घालून घेऊन गेले. सुरुवातीला ही चारचाकी आधी जयभवानीनगरकडे गेली नंतर सिडकोमार्गे शहराबाहेर पळून गेले असल्याचे समोर आले आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. तसंच, आरोपीचा आणि अपहरण झालेल्या मुलाचा कसून शोध सुरू आहे. आरोपींनी बिल्डरकडे 2 कोटींची खंडणी मागितल्याचीही प्राथमिक माहिती समोर येतेय. 

रात्री जेवल्यानंतर वडील आणि मुलगा शतपावलीसाठी बाहेर पडले होते. तितक्यात चार चाकी गाडीतून चार जण उतरले आणि त्यांनी मुलाला उचलून कारमध्ये घेऊन गेले. त्यानंतर वडिलांनी शोधाशोध केली पण तो कुठेच सापडला नाही. त्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत वडिलांना फोन आला तेव्हा आरोपींनी 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली तसंच, मुलगा जिवंत हवा असेल तर पैसे घेऊन या, जागा आणि वेळ कळवतो, अशी धमकी त्यांना देण्यात आली. 

पोलिसांनी फोन ट्रेस केल्यानंतर सिल्लोडजवळ बंद झाल्याची सापडल्याची प्राथमिक माहिती आहे. मुलाचे वडिल हे बिल्डर असल्यामुळं त्यांच्या साइटवरील मजुरांचीदेखील चौकशी सुरू आहे. तसंच, रेकॉर्डवरील गुन्हेगारांचीही चौकशी सुरू आहे. पोलिसांची एकूण 4 पथके मुलाचा शोध घेत आहेत.