मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी; नवीन ऐसपैस लोकल ताफ्यात दाखल होणार

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Feb 13, 2025, 09:03 AM IST
मध्य रेल्वेवरील नागरिकांचा प्रवास आरामदायी; नवीन ऐसपैस लोकल ताफ्यात दाखल होणार title=
Central Railway to Launch AC Local Train with More Space

Mumbai Local Train Update: मध्य रेल्वेच्या ताफ्यात लवकरच एक एसी लोकल दाखल होणार आहे. मध्य रेल्वेने अंडरस्लंग एसी लोकल वापरात आणण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्येच ही लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाली होती. अद्याप एसी लोकलची चाचणी बाकी असल्याने ती अद्याप वापरण्यात आली नव्हती. मात्र आता लवकरच ही नवी एसी लोकल वापरण्यात येणार आहे. 

मध्य रेल्वेवरील जुन्या दोन एसी लोकल देखभाल दुरुस्तीसाठी पाठवण्यात येणार आहेत. अशावेळी सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी ही नवी एसी लोकल आता वापरण्यात येणार आहे. या लोकलची मोटर डब्याच्या बाहेर बसवलेली आहे त्यामुळं प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध होणार आहे. म्हणजेच लोकलच्या डब्यात ऐसपैस जागा असणार आहे. म्हणजेच गर्दी झाली तरी प्रवाशांना व्यवस्थित उभं राहण्यासाठी जागा मिळू शकते. 

नेहमीच्या एसी लोकलमध्ये 1,028 प्रवासी बसू शकतात. तर या नवीन एसी लोकलमध्ये एकूण 1,116 प्रवासी बसू शकतात. ही नवीन अंडरस्लंग एसी लोकल सध्या कुर्ला कारशेडमध्ये आहे. लवकरच या एसी लोकलच्या चाचण्या सुरू करण्यात येणार आह. या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही लोकल सेवेत दाखल करण्यात येणार आहे. नवी एसी लोकल सेवेत दाखल होणार असली तरी सेवांमध्ये वाढ होण्याची शक्यता कमी असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं. 

लोकलसाठी अर्थसंकल्पात किती तरतूद?

मुंबई लोकल आणि मुंबई मेट्रोला आर्थिक रसद तरतूद करण्यात आली आहे. मुंबई महानगर प्रदेशात 14 मेट्रो प्रकल्पांची कामे सुरू असून मेट्रोसाठी अर्थसंकल्पात 1,255.06 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतरामण यांनी अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्पांतर्गंत रेल्वे प्रकल्पांसाठी 611.48 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. लोकलसाठीचा हा निधी खूप महत्त्वाचा ठरणार आहे.