मुंबई : औरंगाबादच्या कचरा प्रश्न आज विधानसभेत जोरदार गदारोळ झाला.
मिटमिटा गावात पोलिसांनी केलेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना रजेवर पाठवण्याच्या मागणीसाठी शिवसेनेनं वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली... तर विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे - पाटलांनी कचराप्रश्न सोडवण्यात प्रशासन अपयशी ठरल्याची टीका केली.
पोलीस जनतेवर लाठीचार्ज करतात, आयुक्त कार्यालयात बसून राहतात. या प्रकरणाची न्यायालीयन चौकशी करावी, अशी मागणी विखे आणि अजित पवारांनी केली...
तर गृहराज्यमंत्री रणजीत पाटील यांनी पोलिस आयुक्त घटनास्थळी होते, असा दावा करून सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.